‘बजाज हाउसिंग’ आणणार आयपीओ; चार हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी | Bajaj Housing IPO Details in Marathi

Bajaj Housing IPO Details in Marathi


Telegram Group Join Now

Bajaj Housing IPO Details in Marathi: बजाज फायनान्सची उपकंपनी असलेल्या बजाज हाउसिंग फायनान्सच्या संचालक मंडळाने आज चार हजार कोटी रुपयांच्या ‘आयपीओ’ला मंजुरी दिली आहे. कंपनीने ही माहिती शेअर बाजारांना कळवली आहे. संबंधित मंजुऱ्या, नियामकांची संमती आणि अन्य बाबींच्या अधीन राहून हा ‘आयपीओ’ बाजारात येईल.

बजाज हाउसिंग फायनान्स ही मोठी बिगरबँकिंग वित्तसंस्था असून, तिचे आठ कोटी छत्तीस लाख ग्राहक देशभरात आहेत. पुण्यात मुख्यालय असलेल्या बजाज हाउसिंग फायनान्स’तर्फे नवी घरखरेदी, घराचे नूतनीकरण किंवा व्यापारी जागांची खरेदी यासाठी नागरिकांना किंवा कंपन्यांना कर्जे दिली जातात. वैयक्तिक किंवा व्यावसायिक गरजांसाठी मालमत्ता तारण ठेवूनही कजें दिली जातात. व्यवसायवाढीसाठी किंवा खेळत्या भांडवलाच्या उभारणीसाठी कंपनीची मालमत्ता तारण ठेवूनही कर्जे दिली जातात. निवासी आणि व्यापारी जागा विकसित करणाऱ्या बांधकाम व्यवसायिकांनाही कंपनी अर्थसाह्य देते. ‘क्रिसिल’ या पतमानांकन संस्थेतर्फे ‘बजाज हाउसिंग फायनान्स’ला दीर्घकालीन कर्जासाठी ‘एएए-स्टेबल’ हा सर्वोच्च मानांकन दर्जा देण्यात आला आहे, तर लघुकालीन कर्जासाठी’ ए वन प्लस’ दर्जा दिला आहे.

बजाज फायनान्सची उपकंपनी असलेल्या बजाज हाउसिंग फायनान्सने गुरुवारी आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये 4 हजार कोटी रुपयांचा आयपीओ आणणार असल्याची माहिती दिली आहे. संपूर्ण आयपीओ ऑफर फॉर सेल (OFS) म्हणून फ्लोट केले जाण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर 2022 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 500 अब्ज रुपयांपेक्षा जास्त मालमत्तेचे व्यवस्थापन करणाऱ्या मोठ्या 16 एनबीएफसीची यादी जारी केली, ज्यामध्ये बजाज हाऊसिंग फायनान्सचाही समावेश होता. ज्यात टाटा सन्स, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस, टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस, आदित्य बिर्ला फायनान्स आणि शांघवी फायनान्स यांचाही समावेश आहे. आरबीआयच्या नियमांनुसार, या कंपन्यांना सप्टेंबर 2025 पर्यंत स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होणे आवश्यक आहे. IPO बद्दल माहिती देताना कंपनीने म्हटले आहे की, हा आयपीओ बाजारातील परिस्थिती, आवश्यक मान्यता आणि नियामकांच्या मंजुरीच्या आधारावर आणला जाईल. या मेगा लिस्टिंगच्या माध्यमातून बजाज ग्रुपची कंपनी अनेक वर्षांनंतर पब्लिक इश्यू आणणार आहे.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.