सर्वसाधारण वर्गातील कुटुंबास घरगुती बायोगॅस बांध्यातून २२ हजार रुपयांचे अनुदान, असा करा अर्ज । Biogas Anudan Yojana Form PDF

Biogas Anudan Yojana Form PDF


Telegram Group Join Now

Biogas Anudan Yojana Form PDF

Biogas Anudan Yojana Form PDF: बायोगॅस सयंत्रामधून बाहेर पडणाऱ्या स्लरीच्या माध्यमातून जमिनीचा पोत सुधारण्याबरोबरच पिकाच्या उत्पादनात ही वाढ होत असल्याने घरगुती बायोगॅस बांधण्याकडे ग्रामीण भागातील लोकांचा कल वाढू लागला आहे. बायोगॅस सयंत्र उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून राष्ट्रीय बायोगॅस विकास व खत व्यवस्थापन कार्यक्रमातून सर्वसाधारण वर्गातील कुटुंबास १४ हजार ३५० तर अनुसूचित जाती जमातीतील लोकांना २२ हजार रुपयांचे अनुदान मिळत आहे.

Biogas Anudan Yojana 2024 Online Form

त्याच बरोबर या दोन्ही घटकांना जिल्हा परिषदेकडून प्रत्येकी दहा हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहेत. सर्वसाधारण वर्गातील कुटुंबास दोन्ही मिळून २४ ३५० तर अनुसूचित जाती जमातीतील कुटुंबास ३२ हजार रुपये मिळत असल्याने बायोगॅस सयंत्र उभारणे सुलभ झालेले आहे. केंद्र सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाद्वारे राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बायोगॅस विकास व खत व्यवस्थापन कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वयंपाकासाठी गॅस पुरवणे, रासायनिक खतांचा वापर कमी करुन, सेंद्रिय खताचा वापर करण्यास लाभार्थ्यांना प्रवृत करणे, एलपीजी व इतर पारंपरिक उर्जा साधनांचा वापर करणे, ग्रामीण भागातील स्त्रियांचे जीवनमान सुधारणे ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून योजना राबवण्यात येतात.

योजनेचा लाभ घेण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या नावे विहीत नमुन्यातील अर्ज करावा लागतो. बायोगॅस सयंत्र उभारण्याच्या ठिकाणचा लाभार्थ्यांच्या नावाचा सात बारा व आठ-अ चा उतारा असणे आवश्यक आहे. गावठाण हद्दीत जागा असल्यास नमुना नं. ८ चा ग्रामपंचायतीकडील उतारा असला पाहिजे. लाभार्थ्यांकडे ३ ते ५ मोठी जनावरे असल्याबाबतचा पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा दाखला असणे गरजेचे आहे. बायोगॅस सयंत्र उभारल्यानंतर बायोगॅस चालू स्थितीत असल्याचा स्वतःचा जीईओ टॅग फोटो असणे गरजेचे आहे. बायोगॅस सयंत्राचे देय अनुदान शासनाच्या पीएफएमएस संगणक प्रणालीद्वारे परस्पर लाभार्थ्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा होतात.

अर्ज कसा करणार ? How To Apply Offline For Biogas Anudan Yojana 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत अर्ज पंचायत समितीकडे जमा करायचे आहेत. सातबारा, जनावरे असल्याचे प्रमाणपत्र, बँकेचे पासबुक, आधारकार्ड, जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. गेल्यावर्षी या संयंत्राचे उद्दिष्ट होते. यंदाही यासाठी उद्दिष्ट देण्यात आले आहे.

बायोगॅस अनुदान योजना 2024 उद्देश

  • ग्रामीण भागात बायोगॅस संयंत्रांच्या उभारणीतून स्वयंपाकासाठी इंधन व सेंद्रीय खत पुरविणे
  • ग्रामीण भागातील स्त्रियांचे जीवनमान सुधारण्यासाठी
  • बायोगॅस संयंत्रांस शौचालय जोडणीतून सर्वसाधारण स्वच्छता तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी
  • केंद्र शासनाने राज्यासाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने शासन स्तरावरुन जिल्हानिहाय उद्दिष्टाचे वाटप

About the Biogas programme

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (MNRE), भारत सरकार ने 2 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रीय जैव ऊर्जा कार्यक्रम अधिसूचित केला आहे. MNRE ने आर्थिक वर्ष 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी राष्ट्रीय जैव ऊर्जा कार्यक्रम सुरू ठेवला आहे. कार्यक्रमाची दोन टप्प्यांत अंमलबजावणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. कार्यक्रमाचा पहिला टप्पा मंजूर करण्यात आला असून रु. 858 कोटी ज्यात रु. बायोगॅस कार्यक्रमासाठी 100 कोटी लहान (प्रतिदिन 1 m3 ते 25 m3 बायोगॅस) आणि मध्यम आकाराच्या बायोगॅस संयंत्रांच्या उभारणीसाठी, म्हणजे 25 m3 ते 2500 m3 पेक्षा जास्त बायोगॅस निर्मितीसाठी प्रतिदिन 3 kW ते 250 kW या वीज निर्मिती क्षमता श्रेणीसाठी थर्मल एनर्जी/कूलिंग ऍप्लिकेशन्ससाठी बायोगॅस किंवा कच्च्या बायोगॅसमधून.
भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने खालील उद्दिष्टांसह बायोगॅस कार्यक्रम सुरू केला:
स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन, प्रकाशयोजना, वापरकर्त्यांच्या थर्मल आणि लहान उर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बायोगॅस संयंत्रांची स्थापना करणे ज्यामुळे GHG कमी, सुधारित स्वच्छता, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण रोजगार निर्मिती.
सेंद्रिय समृद्ध जैव-खत: बायोगॅस वनस्पतींमधून पचलेली स्लरी, खताचा एक समृद्ध स्त्रोत, रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी / कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना फायदा होईल.

अनुदान वितरण :- Anudan Get in Biogas Subsidy

  • सर्वसाधारण गटासाठी – रू. 9,000/- प्रति संयत्र
  • अनुसूचित जाती व जमाती – रु. 11,000/- प्रति संयत्र
  • शौचालय जोडणी केल्यास – रु. 1,200/- प्रति संयत्र

Eligibility Criteria For Biogas Anudan Yojana 

NNBOMP अंतर्गत लहान बायोगॅस संयंत्र स्थापनेसाठी पात्रता.

  • लहान बायोगॅस प्लांट (1 ते 25 m3) बसवण्यासाठी लाभार्थ्याकडे स्वतःची जमीन/जागा सुमारे 50-60 चौरस मीटर क्षेत्रफळ असावा.
  • शेणाची उपलब्धता/ फीडस्टॉक आणि नियमित पाणीपुरवठा.
  • बायोगॅससाठी स्वतःच्या वाट्याचे पैसे गुंतवण्याची आर्थिक क्षमता.
  • केंद्रीय आर्थिक सहाय्य (CFA)

प्लांटच्या क्षमतेवर आधारित, या कार्यक्रमांतर्गत दिलेला CFA खालीलप्रमाणे आहे:

बायोगॅस अनुदान योजना कागदपत्रे – Biogas Subsidy Scheme Documents

  • आधार कार्ड
  • मोबाइल नंबर
  • बँक पासबुक

Biogas subsidy scheme 2024 online application

  • बायोगॅस अनुदान योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी MNRE च्या अधिकृत वेबसाईट वर जा.
  • वेबसाईट च्या होम पेजवर आल्यावर सर्वात वरती उजव्या बाजूला असलेल्या register या बटणावर क्लिक करा
  • नंतर तुमच नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, राज्य, जिल्हा निवडून send otp यावर क्लीक करा.
  • आलेला otp टाकून तुम्ही तुमच रजिस्ट्रेशन करून घ्या.

संपर्क :- Where To Contact For Biogas Anudan 2024

  • जिल्हा स्तरावर – कृषी विकास अधिकारी
  • तालुका स्तरावर – गट विकास अधिकारी/ कृषी अधिकारी /विस्तार अधिकारी(कृषि)

 



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.