Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


नवीन ई-पीक पाहणीसाठी DCS मोबाईल अॅप चा वापर कसा करायचा?? E Pik Pahani in DCS Mobile App

E Pik Pahani in DCS Mobile App


Telegram Group Join Now

E Pik Pahani in DCS Mobile App: E-Peek Pahani DCS Mobile App ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅप रब्बी हंगामासाठी १ डिसेंबर २०२४ पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरु करण्यात आले आहे. यापूर्वी शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणीसाठी जुने मोबाईल अॅप उपलब्ध होते. मात्र, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार, त्यामध्ये तांत्रिक सुधारणा करून नवीन सुधारित ई-पीक पाहणी DCS अॅप तयार करण्यात आले आहे. यानंतर महाराष्ट्रात १००% पीक पाहणी नवीन ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपद्वारे करण्यात येणार आहे.

शेतकरी स्वतः पिकांची नोंद ई-पीक पाहणी मोबाईल अॅप द्वारे नोंदवायचे व उर्वरित पीक पाहणी जे शेतकऱ्यांनी नोंदविलेली नाही ते तलाठी यांच्या मार्फत होत असायची. त्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांना हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी करणे करिता सहाय्यक यांची नेमणूक करण्यात येत आहे. प्रत्येक गावासाठी १ सहाय्यक उपलब्ध राहणार असून सहाय्यक मार्फत पीक नोंदणी होणार आहे

ई-पीक पाहणी अॅपद्वारे पीक पाहणी प्रक्रिया

१. अॅप डाउनलोड आणि इन्स्टॉल करा:

  • Google Play Store उघडून E-Pik Pahani (DCS) अॅप डाउनलोड करा.
  • अॅप डाउनलोड केल्यानंतर ते Install करा आणि उघडा.

२. परवानग्या द्या:

  • अॅप उघडल्यावर तुम्हाला फोटो आणि मीडिया अॅक्सेस साठी परवानगी विचारेल. त्यासाठी Allow वर क्लिक करा.
  • नंतर लोकेशन परवानगी मागेल. त्यासाठी While Using This App निवडा.
  • फोटो आणि व्हिडिओ परवानगी साठी देखील Allow किंवा While Using This App वर क्लिक करा.

३. विभाग निवड:

  • पुढील पेजवर तुमचा विभाग निवडा आणि Right Arrow वर क्लिक करा.

४. लॉगिन करा:

  • लॉगिन पद्धत निवडताना शेतकरी म्हणून लॉगिन करा या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा मोबाईल क्रमांक टाका आणि पुढे जा बटणावर क्लिक करा.

५. जिल्हा, तालुका, आणि गाव निवडा:

  • तुमचा जिल्हा, तालुका, व गाव निवडा आणि Right Arrow वर क्लिक करा.

६. खाते शोधा:

  • पुढील पेजवर तुमच्या खात्याची माहिती भरा. (जसे की पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक किंवा गट क्रमांक).
  • योग्य पर्याय निवडून शोधा बटणावर क्लिक करा.

७. खातेदार निवड:

  • खातेदाराची निवड करा आणि Right Arrow वर क्लिक करा.
  • तुमच्या खाते क्रमांकाची खात्री करून निवड करा.

८. मोबाईल क्रमांक तपासा:

  • तुमचा मोबाईल क्रमांक योग्य असल्यास पुढे जा वर क्लिक करा. जर बदल आवश्यक असेल तर मोबाईल क्रमांक बदला वर क्लिक करा.

९. सांकेतांक (पासवर्ड) टाका:

  • सांकेतांक टाकून पुढे जा. सांकेतांक विसरल्यास, “सांकेतांक विसरलात?” या पर्यायावर क्लिक करा.

१०. पीक माहिती नोंदवा:

  • पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या शेतातील पीक संबंधित सर्व माहिती भरा आणि पुढे जा वर क्लिक करा.

११. शेताचे फोटो अपलोड करा:

  • तुमच्या शेताचे २ छायाचित्रे काढा आणि Right Arrow वर क्लिक करा.

१२. माहिती तपासा आणि सबमिट करा:

  • पुढील पेजवर तुमची संपूर्ण माहिती तपासा.
  • मी घोषित करत आहे वर टिक करा आणि पुढे जा वर क्लिक करा.

१३. यशस्वी अपलोडची पुष्टी:

  • तुम्हाला “पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे” असा मेसेज दिसेल. ठीक आहे वर क्लिक करा.

१४. माहिती पहा:

  • शेवटी, पिकांची माहिती पहा या पर्यायावर क्लिक करून नोंदवलेली माहिती तपासा.

याप्रमाणे तुम्ही ई-पीक पाहणीसाठी सहजपणे माहिती भरू शकता.

नवीन मोबाईल अॅप मधील व पीक प्रक्रियेत झालेले बदल – New Changes in E Pik Pahani App

१) पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून ५० मीटर च्या आत फोटो घेणे अनिवार्य.

२) पिकांचे दोन फोटो घेणे बंधनकारक

३) शेतकऱ्यांच्या पीक पाहणी मदतीसाठी हंगाम सुरु होण्याच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी संबधित समस्या सोडविण्यासाठी सहाय्यक उपलब्ध असेल.

महत्त्वाच्या सूचना:

  • माहिती नेहमी अचूक आणि अद्ययावत भरा.
  • जीपीएस लोकेशन चुकीचे असल्यास प्रक्रिया रद्द होऊ शकते.
  • पिकांचे फोटो घेताना शेताची संपूर्ण दृश्यता सुनिश्चित करा.

अधिक माहितीसाठी:

  • आपल्या तालुका कृषी अधिकारी किंवा ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधा.


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.