केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय: ‘ईपीएस-९५’ धारकांना आता निवृत्तिवेतन कोणत्याही बँकेतून काढता येणार | EPS pensioners to get pension from any bank

EPS pensioners to get pension from any bank


Telegram Group Join Now

EPS pensioners to get pension from any bank

EPS pensioners to get pension from any bank: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे (ईपीएफओ) संचलित ‘कर्मचारी निवृत्ती वेतन योजना १९९५’ (ईपीएस-९५) अंतर्गत आता निवृत्तीवेतनधारकांना कोणत्याही बँकेच्या शाखेतून त्यांच्या निवृत्ती वेतनाची रक्कम काढता येईल, अशी घोषणा केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी केली.

नव्या प्रणालीचे लाभ काय आहेत? What is the Benefit Of New EPS System

नवीन केंद्रीकृत देयक प्रणालीमुळे निवृत्तिवेतनधारकांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले, किंवा बँक किंवा शाखा बदलली, तरी त्यांचे पेन्शन सहजपणे मिळेल. ‘पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ)’ एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरित करण्याची आवश्यकता नसल्याने देशभरातील कोणत्याही बँकेच्या शाखेतून निवृत्तिवेतन मिळवणे सोयीस्कर होणार आहे. निवृत्तीनंतर आपल्या गावी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही प्रणाली विशेषत: उपयुक्त ठरणार आहे, कारण त्यांना जवळच्या बँक शाखेतून मासिक निवृत्तिवेतन मिळण्याची सुविधा मिळेल.

केंद्र सरकारने ‘ईपीएस-९५’ धारकांसाठी केंद्रीकृत देयक प्रणालीला मान्यता दिली आहे. या प्रणालीमुळे देशभरातील कोणत्याही बँकेच्या शाखेतून निवृत्ती वेतन मिळवणे शक्य होईल. ही नवीन प्रणाली १ जानेवारी २०२५ पासून अंमलात येणार आहे.

‘ईपीएफओ’च्या आधुनिकीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीकृत निवृत्तिवेतन देयक प्रणालीला मिळालेली मान्यता. निवृत्तिवेतन मिळवताना ज्येष्ठांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. या प्रणालीमुळे ‘ईपीएस-९५’ योजनेत सहभागी असलेल्या सुमारे ७८ लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार आहे. याशिवाय, या नव्या प्रणालीमुळे ‘ईपीएफओ’चा निवृत्तिवेतन वितरणाचा खर्चही मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे मांडविया यांनी आपल्या निवेदनात सांगितले. केंद्रीय कामगारमंत्री या नात्याने मांडविया हे ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.

ईपीएस निवृत्तीवेतनसाठी पात्र कोण आहे? Who is Eligible For EPS 95 Pension

कर्मचारी निवृत्ती वेतन योजना (ईपीएस) अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी व्यक्तीने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • तो ईपीएफओचा सदस्य असावा
  • त्याने किमान 10 वर्षांची सेवा पूर्ण केली असावी
  • त्याचे वय 58 वर्षे पूर्ण झालेले असावे
  • तो 50 वर्षांनंतर कमी दराने निवृत्तीवेतन काढू शकतो
  • तो आपले निवृत्तीवेतन दोन वर्षांसाठी (60 वर्षे वयोमानापर्यंत) पुढे ढकलू शकतो, त्यानंतर त्याला वाढीव निवृत्तीवेतन मिळेल.


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.