लाडकी बहीण अर्जाचे व्हेरिफिकेशन कसे होणार, पूर्ण प्रक्रिया जाणून घ्या!
ladki bahin yojana verification process
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा जनाधार मिळाला, तो ‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजने’तून, निवडणुकीत या योजनेभोवतीच प्रचार फिरला. आता महायुती सत्तेत आल्यानंतर योजनेत आजवर आलेल्या अर्जाची छाननी सुरू झाली असून, पुण्यात १० हजार लाभार्थ्यांना वगळल्यानंतर मराठवाड्यातील लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. ही योजना सुरू केल्यानंतर विरोधकांनी आरोप केले. त्याला सत्ताधाऱ्यांनी दिलेले उत्तर, कोर्टात दाखल झालेली याचिका, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये निवडणुकीच्या प्रचारात घमासान झाले. (ladki bahin yojana verification process)
२१०० रुपये महायुती देणार, असे जाहीरनाम्यातून लाडक्या बहिणींना वचन दिले गेले, तर महाविकास आघाडीने ३ हजार रुपये दरमहा देण्याचे जाहीरनाम्यातून सांगितले होते. महायुतीचे सरकारचा शपथविधी होऊन एक आठवडा होत नाही तोच योजनेतील लाभार्थ्यांच्या निकषांची पुनर्रचना करण्यात आली आहे. योजनेचा सहावा हप्ता किती लाडक्या बहिणींच्या खात्यावर येणार, याकडे लक्ष लागले आहे.
मराठवाड्यातील २० लाख २५ हजार १२९ महिलांना ६ ऑक्टोबरपर्यंत १ हजार ५१८ कोटी ८४ लाख ६७ हजार ५०० रुपयांचे वाटप केले. पाच हप्ते पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यांवर दिले आहेत. सहावा हप्ता कधी आणि किती लाभार्थ्यांना मिळणार हे विभागातील सगळ्या लाभार्थ्यांच्या अर्जाची पुनः छाननी सुरू झाल्यानंतरच कळेल. सध्या तरी अर्जाची छाननी करण्याबाचत शासनाकडून काहीही सूचना नाहीत. असे विभागीय प्रशासनाने सांगितले. २१ लाख २ हजार १३८ अर्ज या योजनेसाठी आले होते. २० लाख २५ हजार १२९ अर्ज पात्र ठरले. ५ हजार ८५६ अर्ज तत्त्वतः मंजूर केले. ४१ हजार २५८ अर्ज तत्त्वतः रद्द केले; तर ६ हजार २३८ अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली नाही. ६३ हजार ६५७ अर्ज रद्दबातल ठरविले.
पडताळणी कशी होणार? (Verification Process)
या योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे. यातील अपात्र महिलांचे अर्ज बाद करणार आहे. त्यामुळे फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ देण्याचा नव्या सरकारचा भर आहे. या पडताळणी प्रक्रियेत कोणती कागदपत्रे तपासली जाणार?ते जाणून घेऊया.
उत्पन्नाचा दाखला
अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५ लाख असणे आवश्यक आहे. त्याचीच माहिती देणारे कागदपत्रं सादर करणे आवश्यक आहे.
आयकर प्रमाणपत्र
लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत नसावा, अशी अट आहे. त्यामुळे त्याची छाननी केलेली जाईल.
सेवानिवृत्ती पेन्शन आणि वाहन
जर लाभार्थी महिला किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्तीकडे चारचाकी वाहन असेल आणि पेन्शन मिळत असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
शेती
पाच एकरांपेक्षा जास्त जमीन असेल तर महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा
एका कुटुंबातील फक्त २ महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे फक्त २ महिलांना लाभ मिळणार आहे.