Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


जर्मनी देशात नोकरीसाठी इच्छुकांनी नाव नोंदणी करा, नोकरीची सुवर्णसंधी!

जर्मनी देशात नोकरीसाठी इच्छुकांनी नाव नोंदणी करा, नोकरीची सुवर्णसंधी!


Telegram Group Join Now

महाराष्ट्र सरकारने केलेल्या नवीन जर्मनी करार मुळे मराठी उमेदवाराने जर्मनी मध्ये नोकरीच्या लाखो संधी उपलब्ध झाल्या आहेत.जर्मनी देशात नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील पात्र व कुशल युवकांनी https://maa.ac.in/GermanyEmployment/ या वेबसाईटवर आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली चे प्राचार्य डॉ. होसकोटी यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ आणि अन्य प्रगत युरोपियन देशांमध्ये त्यांची असणारी कमतरता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील युवकांना युरोपियन देशांमध्ये नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, ही बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने जर्मन देशातील बाडेन बुटेनबर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देण्याबाबत सामंजस्य करार दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी केला आहे. पुढील कामकाजाची दिशा ठरविण्यासाठी दि. 11 जुलै 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या अनुषंगाने जर्मन भाषा शिकविण्यासाठी ग्योथे इन्स्टिट्यूट, मॅक्सम्युलर भवन, पुणे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या मध्ये दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

Germany Jobs

जर्मन भाषा शिकविण्यासाठी जिल्हास्तरावर 25 वि‌द्यार्थ्यांसाठी एक प्रशिक्षण वर्ग याप्रमणे 10 हजार वि‌द्यार्थ्यांसाठी 400 प्रशिक्षण वर्गाची आवश्यकता आहे. हे प्रशिक्षण वर्ग दोन सत्रात असल्याने (सकाळ व संध्याकाळ) असे 200 प्रशिक्षण वर्ग सुरु करणे प्रस्तावित आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी जर्मन भाषेची अर्हता BA in जर्मन MA In जर्मन व ग्योथे इन्स्टिट्यूट यांचे ‌द्वारे घेण्यात येणारी स्तरनिहाय A1,A2,B1,B2,C1,C2 उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांची संख्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही त्यामुळे शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील नियमित शिक्षकांसाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षण वर्ग शासनामार्फत मोफत सुरु करणे प्रस्तावित असून शिक्षकांची नावनोंदणी करण्यासाठी https://forms.gle/1Q32ByNwp9MnHmHc7 ही गुगल लिंक तयार करण्यात आली आहे. जर्मन भाषा शिकविण्यासाठी मोठ्या संख्येने शिक्षकांची आवश्यकता असल्याने व्यापक लोकहितास्तव सांगली जिल्हा कार्यक्षेत्रातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या इच्छुक अधिकाधिक शिक्षकांनी https://forms.gle/1Q32ByNwp9MnHmHc7 या लिंक वर आपली नाव नोंदणी करण्याचे आवाहनही डॉ. होसकोटी यांनी केले आहे.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.