Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


आयुष्यमान भारत योजनेसाठी ज्येष्ठांनी असा करावा अर्ज!

Ayushman Bharat How to Apply


Telegram Group Join Now

मित्रांनो, सध्या सरकार विविध नवीन योजना सुरु करत आहे. या योजनेत, केंद्र सरकारने ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांनसाठी एक योजना सुरु केली आहे,  हि योजना म्हणजे आयुष्मान भारत! आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना असे या योजनेचे नाव आहे. ही योजना सध्या सरकारने जाहीर केली असून, महिनाभरात ती लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांनी कसा अर्ज करावा (Ayushman Bharat How to Apply), जाणून घेऊ या!

कोटी ज्येष्ठ नागरिकांना फायदा होणार आहे. या योजनेंतर्गत आधीच समाविष्ट असलेल्या कुटुंबांना त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठांसाठी पाच लाख रुपयांचे टॉप अप म्हणजेच अतिरिक्त कव्हरेज मिळणार आहे. हे इतर कुटुंबीयांसोबत शेअर होणार नाही. पाच लाख रुपयांपर्यंत प्रति वर्ष/प्रति कुटुंब मोफत आरोग्य विमा मिळेल. पात्र असलेल्या नागरिकांनी आधार कार्ड किवा रेशन कार्डद्वारे केवायसी करून आयुष्मान भारत योजनेचे कार्ड तयार करणे आवश्यक आहे.

कोणकोणते खर्च योजनेत समाविष्ट आहेत? योजनो तपासणी, उपचार, सल्ला, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा खर्च, औषधी, लॅब तपासणी, शस्त्रक्रिया, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर १५ दिवसांपर्यंतचा देखभालीचा खर्च समाविष्ट आहे.

अर्ज कसा करावा ?

आयुष्यमान भारत योजनेच्या pmjay.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे. मोबाइल क्रमांक नोंदवावा. ओटीपीद्वारे पडताळणी करावी. पात्रतेच्या पडताळणीसाठी आधार कार्ड किवा रेशन कार्डची माहिती द्यावी, या ठिकाणी लाभार्थ्यांच्या वयाची पडताळणी केली जाते. ७० पेक्षा जास्त वय असल्याम नोंदणीची प्रक्रिया पार पाडता येते. इतर निकष लागू होत नाहीत. पडताळणीनंतर कौटुंबिक ओळखीसाठी पुरावे जोडावे. त्यानंतर स्वतंत्र आयुष्यमान भारत योजनेच्या आयडी असलेले ई-कार्ड छापून घ्यावे. पती-पत्नी दोघेही ७० पेक्षा जास्त वयाचे असल्यास दोघांना मिळून ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत होतील. कारण ही कौटुंबिक विमा योजना आहे. या योजनेत संपूर्ण भारतातील सुमार ३०,००० पॅनल रुग्णालयांमध्ये उपचारांचा समावेश आहे.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.