Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


आरोग्य विभागात नर्स पदांच्या ४० जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु, सरळ सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

Arogya Vibhag Bharti Update


Telegram Group Join Now

Arogya Vibhag Bharti Update – स्टाफ नर्स पदांच्या नोकरीसाठी महिला उमेदवारांना एक मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. या द्वारे आपल्याला महाराष्ट्र आरोग्य विभागात सरळ नोकरी मिळू शकते! हो खरच! चला तर या बद्दल पूर्ण माहिती आणि अर्ज कसा करायचा ते समजून घेऊयात. सर्वप्रथम हि भरती फक्त महिला उमेदवारांसाठी आहे. आरोग्य विभागाच्या NHM अंतर्गत हि पदभरती होत आहे. सध्या हि भरती कंत्राटी असली तरी बरेच वेळा यातून विभागात अनेक नोकरीचा संधी उपलब्ध होतात. त्यामुळे हि संधी आपण सोडायला नको. राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, अकोला यांच्या माध्यमातुन हि पदभरती होत आहे. या भरती मध्ये अधिपरीचारीकाचे पुर्णतः कंत्राटी पध्दतीवर भरण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरचे अर्ज टपालाने किंवा प्रत्यक्षरित्या राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी समोर, अकोला येथे विहीत कालावधीत १३  जून २०२५ च्या आधी सादर करावे. 

Arogya Vibhag Bharti Update

या पदभरती करता अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकीत सत्यप्रतीसह दि. १३/०६/२०२५ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत कार्यालयीन वेळेत राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी समोर, अकोला येथे पोष्टाव्दारे अथवा स्वतः सादर करावा. पोष्टाव्दारे विलंबास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच, उपरोक्त पदाकरिता अर्जदाराने A4 आकाराच्या कागदावर सोबत जोडलेल्या विहित नमुण्यातच अर्ज करावा. उमेदवाराने अर्जासोबत शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका जातीचा दाखला/जात वैधता प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा / जन्मतारखेचा दाखला, प्रमाणित केलेले कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्राच्या सांक्षाकित केलेल्या प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. अन्यथा अर्ज विचारात घेतेले जाणार नाही. ज्या प्रमाणपत्रामध्ये Grading System नुसार मार्क असतील त्यांनी संबंधित प्रमाणपत्रामागील Grade Card झेरॉक्स अर्जासोबत जोडण्यात यावी.

अर्ज करण्याआधी काही महत्वाच्या बाबी समजून घेऊया, उपरोक्त जाहिरात नुसार कोणत्या प्रवर्गामध्ये अर्ज सादर करावयाचा आहे असे फॉर्म वर उमेदवारांनी स्पष्टपणे नमुद करण्यात यावे. पदभरती जाहिरात व अर्जाचा नमुना जिल्हयाच्या संकेतस्थळावर www.akolazp.gov.in या website वर प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच पदभरती विषयक पुढील सुचनाही याच संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील. याबाबत अर्जदारास कुठलाही स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही. सदर पद राज्यशासनाची पद नसुन निव्वळ कंत्राटी स्वरुपातील पदे आहेत. सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागु नाही, तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावुन घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही. पदांची संख्या गरजेप्रमाणे बदलण्याची शक्यता आहे पदांसाठीचे वेतन है एकत्रित मानधन आहे. पदसंख्या, शैक्षणिक अर्हता, मानधन, सामाजिक आरक्षण, नियुक्तीचे ठिकाण, आवश्यकतेनुसार बदल करण्याचे सर्व अधिकार निवडसमितीला असतील.  सदरील पदे राष्ट्रीय आरोग्य अभियानाशी/राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाशी संबंधीत नाहीत, त्यामुळे भविष्यात सदरील योजना/कार्यक्रम बंद पडल्यास अथवा पदांना मंजुरी न मिळाल्यास त्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये / राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानामध्ये समावुन घेण्याचा दावा करता येणार नाही.

मुलाखतीस उपस्थित राहतांना उमेदवाराने मुळ शैक्षणीक कागदपत्रे तसेच नोंदणी प्रमाणपत्रासह हजर राहणे आवश्यक राहील. मुलाखतीकरिता उपस्थित राहण्यासाठी कुठलाही प्रवास/दैनंदिन भत्ता दिला जाणार नाही. उच्च शैक्षणिक अर्हता धारकांस व अनुभव असलेल्या उमेदवारांस प्राधान्य दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांस सुरुवातीला ११ महिणे २९ दिवस नेमणुक दिली जाईल. या कालावधीत केलेले काम समाधानकारक असल्यास नेमणुकीचा कालावधी वाढविण्याची शक्यता आहे. काम असमाधानकारक असल्यास कामावरुन कमी करण्यात येईल. उमेदवाराची निवड झाल्यावर जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, अकोला यांच्याकडे रु.५००/- च्या स्टॅम्प पेपरवर करारनामा भरुन देणे बंधणकारक राहील. भरती प्रक्रिया संबंधी सर्व अधिकार तसेच अर्ज स्विकारणे, नाकारणे अथवा भरती प्रक्रिया संपुर्णपणे रद्द करण्याचा अधिकार, अध्यक्ष, निवड समिती यांनी राखुन ठेवले आहे. अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा. केंद्र अथवा राज्य शासनाकडुन संबंधित पद नामंजुर झाल्यास उमेदवारांस कोणतीही पूर्व सुचना न देता संबंधित उमेदवाराची सेवा तात्काळ संपुष्टात येईल.

या भरतीच्या महत्वाच्या लिंक आणि जाहिरात 

📑 PDF जाहिरात

रोजगार मेळा
महाभरती
https://shorturl.at/n0BhC
✅ अधिकृत वेबसाईट
https://akola.gov.in/


अन्य महत्वाचे अपडेट्स बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.