Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel



खुशखबर! अखेर PM किसान योजनेचा २० वा हप्ताची तारीख जाहीर!

pm kisan yojana 20th installment date


Telegram Group Join Now

मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान pm kisan yojana 20th installment date) योजनेचा बद्दल एक महत्वाचा या अपडेट समोर आला आहे. आपल्याला माहीतच असेल पीएम-किसान योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, जी तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करणे आणि त्यांना शेतीसाठी आवश्यक संसाधने प्रदान करणे आहे. मागील बऱ्याच दिवसापासून या योजनेचा पुढील हफ्ता कधी येणार या बद्दल संभ्रम होता. परंतु आताच प्राप्त माहिती नुसार या योजनेचा  २० वा हप्ता २० जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. सरकारने शेतकऱ्यांना त्यांचे EKYC आणि आधार तपशील लवकरात लवकर अपडेट करण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून त्यांना वेळेवर हप्त्याचा लाभ मिळू शकेल. त्याच प्रमाणे, सरकारने असेही स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांची माहिती अपडेट केलेली नाही त्यांना हप्त्याचा लाभ मिळण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे, सर्व शेतकऱ्यांना त्यांची माहिती लवकरात लवकर आपली वाचून आवश्यक ती माहिती अपडेट करण्याची विनंती आहे.  चला तर या बद्दल अजून महत्वाचे अपडेट्स बघूया!

pm kisan yojana 20th installment date

शेतकऱ्यांनी त्यांची माहिती वेळेवर अपडेट करणे महत्वाचे आहे जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. सरकारच्या या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी, सर्व शेतकऱ्यांनी त्यांचे ईकेवायसी आणि आधार तपशील लवकरात लवकर अपडेट करावेत. या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी डीबीटीद्वारे ₹२,००० मिळतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या शेतीचा खर्च आणि घरगुती गरजा पूर्ण करण्यास मदत होते. आतापर्यंत १९ हप्ते जारी करण्यात आले आहेत, त्यापैकी शेवटचा फेब्रुवारी २०२५ मध्ये देण्यात आला होता. पुढील हप्ता जूनमध्ये मिळण्याची अपेक्षा आहे, pm kisan yojana 20th installment date जरी अधिकाऱ्यांनी अद्याप निश्चित तारीख दिलेली नाही तरी हा हफ्ता लवकरच आपल्याला मिळणार आहे.

तसेच एक लक्षात ठेवा, हा हप्ता मिळविण्यासाठी, शेतकऱ्यांना काही अटी पूर्ण कराव्या लागतील, जसे की:

१. लागवडीयोग्य जमिनीची कायदेशीर मालकी असणे

२. भारतीय नागरिक असणे

३. तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करणे

४. इलेक्ट्रॉनिक केवायसी (eKYC) औपचारिकता ऑनलाइन किंवा CSC केंद्रांवर पूर्ण करणे

आपले KYC ऑनलाईन कस करायचं ?

शेतकरी मित्रांनो, ऑनलाईन KYC करणं एकदम सोपं आहे, सर्वप्रथम आपण pmkisan.gov.in पोर्टलवर जाऊन त्यांचा आधार क्रमांक सबमिट करून आणि OTP द्वारे त्याची पडताळणी करून eKYC पूर्ण करू शकतात. या द्वारे बँक शाखांमध्ये किंवा आधार-सक्षम सेवा आणि मोबाइल अॅप्सद्वारे आधार बँक खात्यांशी जोडता येतो. लाभार्थ्यांना पोर्टलवरील ‘फार्मर्स कॉर्नर’ विभागात जाऊन त्यांचा आधार किंवा नोंदणी क्रमांक एंटर करून नियमितपणे त्यांची स्थिती बघावी. म्हणजे आपल्याला लाभ वेळेवर मिळत राहील.



अन्य महत्वाचे अपडेट्स बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.