ZP मध्ये बोगस दिव्यांगांना मिळणार सक्तीची निवृत्ती – ZP Divyang Bharti Update Details
ZP Divyang Bharti Update Details
ZP Divyang Bharti Update Details – दिव्यांगभरती संदर्भातील एन नवीन मोठा अपडेट समोर आला आहे. आता दिव्यांग उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार दिव्यांग कर्मचारी व दिव्यांग व्यक्तींच्या प्रमाणपत्राची तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. काही कर्मचाऱ्यांनी याविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिव्यांगत्व पडताळणीस परवानगी दिली असून, जे कर्मचारी ० ते १० टक्के दिव्यांग असतील, अशा बोगस दिव्यांगांना १५ दिवसांची नोटीस बजावून विभागीय चौकशी करीत थेट सक्तीची सेवानिवत्ती द्यावी. मिळविणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून ६८७ कर्मचाऱ्यांची पुनर्पडताळणी होणार आहे. या मुळे खोट्या दिव्यांग उमेदवारांना चाप बसणार आहे तर अधीकृत खऱ्या दिव्यांग उमेदवारांना दिलासा मिळणार आहे!

जिल्हा परिषदेच्या आस्थापनावर कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची तपासणी सामान्य प्रशासन विभागाकडून सुरू करण्यात आली होती. यात जिल्हा परिषदेत ६८७ दिव्यांग कर्मचारी आढळून आले होते. त्यांना तपासणीसाठी शासकीय महिविद्यालयात पाठविण्यात आले. त्यापैकी ८१ कर्मचाऱ्यांचे अहवाल येऊन ३६ कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र, यातील सहा कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ६ मेस दिलेल्या निकालात शासकीय सेवेतील बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.


