महत्वाचे!-पाण्याचा सातबारा काढणार; बचत करणाऱ्यांच्या खात्यावर क्रेडिट होणार- Panyacha Satbara online Maharashtra
Panyacha Satbara online Maharashtra – So Now the Maharashtra State Sarkar is in Active mode from this year for Water Management. The Government of Maharashtra is set to launch a pioneering environmental initiative named ‘Panyacha Satbara’ (Water Credit System) to tackle growing water scarcity, climate change, and the unpredictable impacts of El Niño. Inspired by the traditional 7/12 land records, this system introduces a structured approach to digital resource management across rural and urban landscapes. Under this framework, every Gram Panchayat and local watershed area will manage a digital ledger to maintain a transparent account of total available water stock, daily consumption, and remaining resources. By enforcing a mandatory water audit report Gram Panchayat Maharashtra, the state aims to eliminate indiscriminate water usage and bring strict accountability to natural water sources.
राज्यात वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंपत्तीचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकार ‘पाण्याचा सातबारा’ ही अभिनव संकल्पना राबविण्याच्या तयारीत आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत किंवा पाणलोट क्षेत्रातील उपलब्ध पाणीसाठा, वापर आणि शिल्लक पाण्याचा पारदर्शक हिशेब ठेवला जाणार आहे. नैसर्गिक जलस्रोतांची डिजिटल नोंदणी करून पाण्याचे नियमित ऑडिट करण्यात येणार आहे. यामुळे बेसुमार पाणी वापरावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे, पाण्याची बचत करणाऱ्या ग्रामपंचायती, संस्था आणि व्यक्तींना कार्बन क्रेडिट्सच्या धर्तीवर ‘अॅक्वा क्रेडिट्स’ दिले जाणार आहेत. हवामान बदल, अनियमित पाऊस आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम जलसंवर्धनासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. Maharashtra Water Credit System Online Or Aqua Credits Scheme Maharashtra

पाण्याचा सातबारा म्हणजे काय? (Key Features)
- डिजिटल जल नोंदणी (Digital Water Audit): या उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत किंवा पाणलोट क्षेत्रातील (Watershed Area) उपलब्ध एकूण पाणीसाठा, पाण्याचा दैनंदिन वापर आणि शिल्लक पाण्याचा संपूर्ण पारदर्शक हिशेब ठेवला जाईल.
- नियमित वॉटर ऑडिट: नैसर्गिक जलस्रोतांची डिजिटल नोंदणी करून पाण्याचे नियमित ऑडिट करण्यात येणार आहे, ज्यामुळे बेसुमार आणि अनधिकृत पाणी वापरावर नियंत्रण मिळवणे सोपे होईल.
- अॅक्वा क्रेडिट्स (Aqua Credits): सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जे गाव, संस्था किंवा व्यक्ती पाण्याचा सुयोग्य वापर करून पाण्याची बचत करतील, त्यांना कार्बन क्रेडिट्सच्या धर्तीवर ‘अॅक्वा क्रेडिट्स’ देऊन सन्मानित व प्रोत्साहित केले जाईल.
Panyacha Satbara online Maharashtra Download PDF
एकूण पाणी वापराचा हिशोब ठेवला जाणार
शेती, पिण्याचे पाणी, उद्योग आणि इतर वापरासाठी किती पाणी खर्च झाले याची नोंद ठेवली जाणार आहे. उपलब्धता आणि वापर यांची तुलना करून भविष्यातील नियोजन केले जाणार आहे. यामुळे पारदर्शकता वाढणार आहे. जमिनीच्या सातबाऱ्याप्रमाणे प्रत्येक गावाचा किंवा पाणलोट क्षेत्राचा स्वतंत्र ‘पाण्याचा सातबारा’ तयार केला जाणार आहे. यात उपलब्ध पाणीसाठा, वापर आणि शिल्लक पाण्याची माहिती नोंदविली जाणार आहे. यामुळे जलसंपत्तीचा स्पष्ट लेखाजोखा उपलब्ध होणार आहे. Gram Panchayat Water Audit Report PDF & जलसंधारण विभाग नवीन जीआर (GR)
तीन टप्प्यांत करणार पाण्याचे ऑडिट
पाण्याचे ऑडिट पूर्वमान्सून, मान्सून आणि उत्तरमान्सून अशा तीन टप्प्यांत केले जाणार आहे. प्रत्येक टप्प्यात जलस्रोतांची स्थिती आणि उपलब्धतेचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे पाणी साठ्यातील बदलांचे अचूक चित्र समोर येईल. नद्या, नाले, तलाव, विहिरी, बंधारे आणि जलाशयांची डिजिटल नोंदणी केली जाणार आहे. प्रत्येक स्रोताचे जीआयएस मॅपिंग करण्यात येणार आहे. यामुळे जल संपत्तीचे व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार आहे.
Panyacha Satbara 2026 PDF Download Link
पाण्याच्या सातबाऱ्यात या नोंदी घेतल्या जाणार
जलस्रोतांचे स्थान, पाणी साठ्याची क्षमता, उपलब्धता, वापराचे प्रमाण आणि शिल्लक पाण्याचा तपशील नोंदविला जाणार आहे. भूजल आणि पृष्ठभागावरील पाण्याची माहितीही समाविष्ट असेल. सर्व माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध राहणार आहे. पाणी बचत आणि जलसंवर्धनासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या ग्रामपंचायती, संस्था आणि व्यक्तींना ‘अॅक्वा क्रेडिट्स’ दिले जाणार आहेत. कार्बन क्रेडिट्सच्या धर्तीवर हा प्रोत्साहनपर उपक्रम राबविला जाणार आहे.


