असे मिळवा घरबसल्या एसटी पास योजना , विद्यार्थ्यांसाठी नवीन सुविधा जाहीर !
ahilyabai holkar st pass yojana
लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनीना आता एसटीचे पास शाळा महाविद्यालयांमध्येच वितरित करण्यात येणार आहेत. नागपूर विभागीय कार्यालयासह सर्व आगार प्रमुखांना पाबाबतच्या सूचना परिवहन मंत्री व महामंडळाच्या अध्यक्षांनी दिल्या आहेत. नवीन शैक्षत्रिक वर्षाच्या पहिल्या सातील शाळा येत्या १६ जूनपासून सुरू होत आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६.६६ टक्के इतकी सवलत दिली आहे. म्हणाने केवळ ३३.३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता पेगार आहे. त्याचाप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पोजनेंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना एसटी पासचे मोफत वितरण केले जाते.
अहिल्याबाई होळकर योजनेची सुरुवात १९९६-९७ मध्ये करण्यात आली. अहिल्याबाई होळकर योजना हि ग्रामीण भागातीली. ५ वि ते १० वी पर्यंत शिक्षण घेत असणार्या मुलींसाठी आहे. त्यांचा गावात शाळा उपलब्ध नसल्यास बाहेर गावी एस.टी ने प्रवास करावा लागतो. अश्या मुलीना-विद्यार्थिनीना बसचा प्रवास मोफत उपलब्ध करून देण्यासाठी अहिल्याबाई होळकर योजना Ahilyabai Holkar Yojana हि सुरु करण्यात आली आहे. अहिल्याबाई होळकर योजनेचा लाभ हा इ. ५ वी ते इ.१० वी मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या मुलींसाठी आहे. बाहेर गावी बसने प्रवास करावा लागत असेल. अश्या विद्यार्थिनीना मोफत प्रवास करण्याची सुविधा अहिल्याबाई होळकर योजनेतून उपलब्ध करून दिला जातो. चाल तर अर्ज पद्धती आणि पूर्ण माहिती बघूया.
अहिल्याबाई होळकर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे
- विहित नमुना अर्ज
- आधार कार्ड
- प्रवेश पावती
- बोनाफाईड
- 75% हजेरी प्रमाणपत्र
- 2 पासपोर्ट फोटो
- वरील कागदपत्रामध्ये वेळेनुसार बदलही होऊ शकतो, त्यामुळे संबधित कार्यलय किंवा शाळेशी संपर्क साधून आपण अर्ज करू शकतात !
विद्यार्थिनीना एसटीच्या केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहून पास ध्यावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापकाकडून पास घेतले जात असत. आता विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा, महाविद्यालयांनी पुखलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचान्यांकडून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना एसटीचे पास घेट शाळेत देण्यात येणार आहेत.