Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


Annabhau Sathe Karj Yojana – अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजनेची इत्यंभूत माहिती जाणून घ्या

Annabhau Sathe Loan Scheme -slasdc.org


Telegram Group Join Now

Annabhau Sathe Karj Yojana 2024

Annabhau Sathe Karj Yojana: In order to raise the standard of living of the Matang and similar communities living below the poverty line in the state of Maharashtra, to help them in their educational, economic and social development with the aim of giving them a place of honor in the social stream, the Government of Maharashtra established the Demokratir Anna Bhau Sathe Development Corporation as per the provisions of the Companies Act, 1956 (1). Dated 11 July 1985 under Social Justice Department. Through this corporation established in the name of venerable Anna Bhau Sathe, a democrat who inspired real social progress through writing for the Matang community. Know more about Annabhau Sathe Karj Yojana Application at below:

Annabhau Sathe Karj Yojana LASDC Schemes

योजनेचे नाव अण्णाभाऊ साठे कर्ज योजना
विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
उद्देश नागरिकांचे जीवनमान सुधारणे
लाभ विविध प्रकारचे आर्थिक सहाय्य
लाभार्थी आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे

विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना (SCA)

अनुदान योजना

– प्रकल्प मर्यादा रु. ५०,००० पर्यंत गुंतवणूक असलेल्या कर्ज प्रकरणात महामंडळाकडून अनुदान देण्यात येते. प्रकल्प खर्चाच्या ५०% किंवा रु. १०,००० यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल.

बँक कर्ज – अनुदान वगळून बाकीची सर्व रक्कम बँकेचे कर्ज असते. या कर्जावर बँकेच्या दराप्रमाणे व्याज आकारणी होते. कर्ज फेड ३६ ते ६० समान मासिक हप्त्यात बँकेकडे करावी लागते.

प्रशिक्षण योजना (TRAINING SCHEME)

तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी शासनमान्य संस्थांना प्रशिक्षणार्थी देण्यात येतात. प्रशिक्षणाचा कालावधी सहा ते बारा महिने असतो.

संस्थांची फी

अ. तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षणाच्या एकूण कालावधीची प्रति प्रशिक्षणार्थी फी रु. २,५००

आ. संगणक प्रशिक्षणासाठी एकूण प्रशिक्षण कालावधीची प्रति प्रशिक्षणार्थी फी रु. ३,५००

इ. वाहन चालक प्रशिक्षणासाठी एकूण प्राशिक्षण कालावधीची प्रति प्रशिक्षणार्थी फी (चारचाकी वाहनासाठी) रु. २,३०० (तीन चाकी वाहनासाठी) रु. २,०००

ई. ब्युटी पार्लर प्रशिक्षणाच्या एकूण कालावधीची प्रति प्रशिक्षार्थी फी रु. ३,५००

ड. शिवणकला प्रशिक्षणाच्या एकूण कालावधीसाठी प्रति प्रशिक्षणार्थी फी रु. १,२००

फी व्यतिरिक्त विद्यावेतन

अ. प्रशिक्षणार्थी रहात असलेल्या ठिकाणीच प्रशिक्षण घेत असल्यास प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा रु. १५०

आ. महानगपालिका क्षेत्रात राहणाऱ्या व प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीस दरमहा रु. २५०

इ. प्रशिक्षणार्थी रहात असलेल्या खेड्यात / शहराव्यतिरिक्त अन्य खेड्यात / शहरात प्रशिक्षण घेत असल्यास प्रतिमहा रु. ३००

Annabhau Sathe Karj Yojana Application

Annabhau Sathe Karj Yojana 2024

योजनेच्या अटी व अर्ज – Annabhau Sathe Yojana Arj

महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमधून आर्थिक लाभ मिळण्यास सर्वसाधारण आवश्यक बाबी –

१. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
२. अर्जदाराचे वय १८ वर्ष पूर्ण असावे व ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
३. अर्जदार हा मातंग समाजाच्या १२ पोट जातीतील असावा.
४. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे पूर्ण ज्ञान व अनुभव त्याच्याकडे असावा.
५. केंद्रीय महामंडळाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. ९८,००० पेक्षा कमी तर शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. १,२०,००० पेक्षा कमी असावे.
६. राज्य शासनाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण तसेच शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. १,००,००० पेक्षा कमी असावे.
७. अर्जदाराने या महामंडळाकडून व इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
८. महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी आणि शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.

अर्जाचा नमुना व सोबत जोडावयाची कागदपत्रे – Imp Documents For slasdc Loan Scheme

१. अर्जदाराचा जातीचा दाखला. (सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा.)
२. अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पनाचा दाखला. (तहसीलदार ह्यांच्याकडून घेतलेला असावा.)
३. अ) नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या २ प्रति जोडाव्यात.
ब) राष्ट्रीय अनुसूचित जाती, जमाती वित्तीय विकास महामंडळाच्या योजनेचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराच्या बाबत नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या ३ प्रति जोडाव्यात.
४. अर्जदाराचा शैक्षणिक दाखला.
५. रेशन कार्ड झेरॉक्स प्रती/ आधार कार्ड झेरॉक्स प्रती/ मोबाईल नंबर.
६. ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेच्या उपलब्धतेबाबतचा पुरावा.
७. ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेची भाडे पावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा.
८. एन. एस. एफ. डी. सी. योजनेखाली वाहन खरेदी करण्यासाठी ड्रायव्हींग लायसन्स व आर. टी. ओ. कडील प्रवासी वाहतूक परवाना इत्यादी.
९. वाहन खरेदीसाठी वाहनाच्या बुकिंगबद्दल / किंमतीबद्दल अधिकृत विक्रेता/ कंपनीकडील दरपत्रक.
१०. व्यवसायसंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला.
११. व्यवसायासंबंधी प्रकल्प अहवाल / खरेदी करावयाच्या मालाचे, साहित्याचे कोटेशन.
१२. प्रतिज्ञापत्र (स्टॅम्प पेपरवर)

कर्ज मंजुरीची प्रक्रिया – Loan approval process For slasdc Yojana 2024

व्यवसायासाठी अर्थसहाय्य मिळण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत
१. अर्जाचा फॉर्म सर्व जिल्हा कार्यालयामध्ये विनामूल्य उपलब्ध आहे.
२. विहित नमुन्यातील अर्ज भरून संपूर्ण कागदपत्रासह जिल्हा कार्यालयात द्यावयाचा आहे.

अर्ज प्राप्त झाल्यावर महामंडळामार्फत करावयाची कार्यवाही
महामंडळाच्या सर्व जिल्हास्तरीय कार्यालयात लाभार्थींकडून प्राप्त झालेल्या विविध योजनांची सर्व कर्ज प्रकरणे, शासन निर्णय. क्र. मकवा २०१२/ प्र. क्र. १४९/ महामंडळे/ २०१२ दि. १४ मे २०१२ अन्वये, गठीत केलेल्या लाभार्थी निवड समिती समोर ठेवण्यात येतात. समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावास कर्ज मंजुरीसाठी महामंडळामार्फत शिफारस केली जाते. कर्ज मंजुरीची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे.
१. जिल्हा कार्यालयात विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना व बीज भांडवल योजनेखाली अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हा व्यवस्थापक यांनी अर्जासोबत जोडलेल्या संपूर्ण कागदपत्रांची छाननी करून व आवश्यक त्या प्रकरणात प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवालासह स्थानिक सेवाक्षेत्रात येणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकेस मंजुरीसाठी शिफारस करतात.
२. जिल्हा कार्यालयात एन. एस. एफ. डी. सी. योजनेअंतर्गत अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हा व्यवस्थापक रीतसर त्या प्रकरणाची नोंद करून कागदपत्रांची छाननी करून व प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून स्पष्ट अभिप्रायासह प्रादेशिक कार्यालयाकडे तो अर्ज पुढील कार्यवाहीसाठी शिफारस करतात.
३. प्रादेशिक कार्यालयामार्फत जिल्हावार कर्ज प्रकरणांची जेष्ठतेनुसार नोंद करून अर्जासोबत पाठविण्यात आलेल्या कागदपत्रांची शहानिशा करण्यात येते व कर्ज प्रकरणांची मुख्य कार्यालयाकडे शिफारस करण्यात येते.
४. मुख्यालयाकडून देण्यात आलेल्या व्यवसायनिहाय उद्दिष्टांप्रमाणे प्रादेशिक व्यवस्थापक योग्य त्या शिफारशींसह जिल्हावार जेष्ठतेनुसार कर्जप्रकरणे मंजुरीसाठी मुख्यालयास शिफारस करतात.
५. मुख्यालयात संबंधित शाखेत प्रादेशिक कार्यालयाकडून व्यवसायनिहाय आलेल्या कर्ज प्रकरणांची नोंद घेतली जाते व कर्ज प्रकरणाची छाननी करून निधी उपलब्धतेनुसार जेष्ठतेनुसार मंजुरी प्रदान केली जाते.

अण्णा भाऊ साठे कर्ज योजना अंतर्गत कोण लाभ घेऊ शकतात ? – Lokshahir Anna Bhau Sathe Karj Yojana  Beneficery

मातंग
मांग
मिनी-मादींग
दानखणी मांग
मादींग
मदारी
मांग महाशी
मांग गारुडी
राधे मांग
मांग गारुडी
मादगी
मादिगा

Official Website – www.slasdc.org

Annabhau Sathe Loan Scheme: Application Process

You can get the application form from District Office, Annabhau Sathe Development Corporation.
You can download the application form from the official website https://www.slasdc.org/.

2. Online:
Official Website:

You can apply online from the official website https://www.slasdc.org/.
Online Application Form:

Download and complete the online application form from the website.
Scan and upload the required documents.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.