HDFC बँकेचा मोठा निर्णय; SMS अलर्ट मिळणार नाही ! HDFC Bank To Stop SMS Alerts
HDFC Bank To Stop SMS Alerts
HDFC Bank To Stop SMS Alerts: HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना सूचित केले आहे की ते 100 रुपयांपेक्षा कमी UPI खर्च किंवा 500 रुपयांपेक्षा कमी रकमेच्या पावतीसाठी एसएमएस अलर्ट पाठवणे थांबवेल. विशेष म्हणजे 25 जूनपासून हे पाऊल अंमलात येईल, असे बँकेने म्हटले आहे.
सरकारी असो वा खासगी, सर्वच बँका सध्या आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑनलाइन व मोबाइल बँकिंग सेवा देतात. ग्राहकानं केलेल्या प्रत्येक व्यवहाराचा एसएमएस अलर्ट आणि ई-मेल सूचना हा त्याचाच एक भाग आहे. एचडीएफसी ही बँकही त्यास अपवाद नाही. आतापर्यंत ही बँक १ रुपयांच्या व्यवहाराचाही अलर्ट पाठवत असे. त्यामुळं ग्राहकांना आपण केलेल्या व्यवहाराची माहिती तात्काळ मिळत असे. मात्र आता यात काही प्रमाणात बदल करण्याचा निर्णय बँकेनं घेतला आहे. आता १०० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांसाठी किंवा UPI द्वारे ५०० रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्यासच ग्राहकांना एसएमएस मिळणार आहेत.
Read This also: १ जूनपासून नवीन ड्रायव्हिंग लायसन्स नियम; जाणून घ्या काय बदललं?
ईमेल अलर्ट सुरूच राहतील!
एसएमएस अलर्ट बंद होणार असले तरी ई-मेल अलर्ट सुरूच राहतील. सर्व प्रकारच्या व्यवहारांसाठी ईमेल अलर्ट पाठवले जातील, असंही बँकेनं स्पष्ट केलं आहे. यूपीआय पेमेंट अॅप देखील अलर्ट पाठवत असतात. त्यामुळं पुन्हा बँकेनं छोट्या रकमेच्या व्यवहाराचे अलर्ट पाठवण्याची गरज नाही, अशा प्रतिक्रिया ग्राहकांकडून आल्या होत्या. त्याचा विचार करून बँकेनं हा निर्णय घेतला आहे.
प्राथमिक ईमेल पत्ता अपडेट करा
HDFC बँकेनं आपल्या ग्राहकांना सर्व व्यवहारांच्या सूचना मिळवण्यासाठी त्यांचा प्राथमिक ईमेल पत्ता अपडेट ठेवण्याचा सल्ला दिला आहे. UPI व्यवहारांचं सरासरी मूल्य कमी होत आहे. लहान पेमेंटमध्ये वाढ झाली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या डेटानुसार, UPI व्यवहार १०० अब्जांचा टप्पा ओलांडतील आणि वर्षाच्या अखेरीस ११८ अब्जांपर्यंत पोहोचतील.
UPI Lite बूस्ट
बँका देखील ५०० रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी UPI Lite ला प्रोत्साहन देत आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण अॅपमध्ये एक लहान रक्कम बाजूला काढून ठेवता येते. या रकमेला सेकंड फॅक्टर ऑथेंटिकेशनची गरज लागत नाही. त्यामुळं पेमेंट झटपट करता येते.