Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


खुशखबर, महाराष्ट्रात होमगार्डसाठी ९,७०० पदांची महाभरती;१० वी पास उमेदवार करु शकतात अर्ज! – Homeguard bharti 2024 maharashtra


Telegram Group Join Now

महाराष्ट्र होमगार्ड संघटने अंतर्गत मोठी भरती होणार आहे. ३४ जिल्ह्यातील एकूण ९७०० होमगार्ड पदे भरली जाणार आहे. यासाठी पत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावी पास उत्तीर्ण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकणार आहेत. राज्यात होमगार्ड पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.होमगार्ड जवान या पदासाठी ९७०० जागा रिक्त आहेत. २० ते ५० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.शारिरीक विकलांग आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकत नाही. १६ ऑगस्ट २०२४ पासून या भरतीची सुरुवात होणार आहे. होमगार्ड नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.या नोकरीसाठी शारीरिक पात्रता चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर मैदानी चाचणी आणि कागदपत्रे पडताळणी केली जाईल. तसेच या संदर्भातील नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा 

Maharashtra-Home-Guard-Bharti-2024 New_1

या नोकरीसाठी उमेदवार ज्या जिल्ह्याचा रहिवासी आहे त्याच जिल्ह्यात नोकरी मिळणार आहे.त्यामुळे उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करणे गरजेचे नाही. याबाबत अर्ज प्रक्रिया १६ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.याचसोबत सध्या बीएसएफमध्ये पॅरामेडिकलमध्ये नोकरीची संधी आहे. या नोकरीसाठी २५ जुलै २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. १०वी आणि १२ वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारिरीक चाचणीद्वारे घेतली जाईल.

 

  • भरती विभाग – महाराष्ट्र होमगार्ड संघटना  कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या- महाराष्ट्र होमगार्ड संघटना कडून तब्बल 9,700 पदांची मेगा भरती करण्यात येत आहे.
  •  पदांचे नाव –  महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी चे ठिकाण : महाराष्ट्र होमगार्ड संघटना  ने PDF जाहिराती मध्ये अस सांगितल आहे . ही भरती संपूर्ण महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांसाठी आहे उमेदवार हे आप आपल्या जिल्ह्यामध्ये नोकरी करू शकता. कोणकोणते जिल्ह्यांसाठीही भरती आहे ती माहिती जाणून घेण्यासाठी पीडीएफ जाहिरात बघा पीडीएफ जाहिरातीमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.
  •  शैक्षणिक पात्रतामहाराष्ट्र होमगार्ड संघटना  च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता 10वी पास असलेले उमेद्वार अर्ज करू शकतात .( शैक्षणिक पात्रता सविस्तर माहिती pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे )
  • वेतन / पगार – महाराष्ट्र होमगार्ड – या पदांच वेतन मानधन हे रु.500/- ते रु.700/- प्रति दिवस जेवढा मिळू शकत. हा फक्त अंदाज आहे वेतन विषयी अधिकृत माहिती लवकरच मिळणार आहे त्याकरिता आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन रहा.
  • अर्ज करण्याची  पद्धत  – या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे अर्ज पत्ता व इतर सर्व माहिती 16 ऑगस्ट  च्या दिवशी सर्व माहिती मिळणार आहे.
  • अर्ज प्रक्रिया ही 16 ऑगस्ट 2024 पासून सुरू होत आहे


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.