Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


हजारो लाडक्या बहिणींचे अर्ज अजूनही प्रलंबितच, तुमच्या अर्जाच स्टेट्स काय जाणून घ्या!

ladki bahin yojana update 2024 Application Form Pending


Telegram Group Join Now

लाडकी बहिण योजनेंतर्गत (ladki bahin yojana update 2024 Application Form Pending ) आतापर्यंत ७ लाख ३ हजार ४३६ महिलांनी अर्ज दाखल केले असून त्यापैकी ६ लाख ८९ हजार ४९६ अर्ज मंजूर करण्यात आले आहे. विविध कारणांमुळे अद्यापही हजारी महिलांचे अर्ज मंजूरीसाठी प्रलंबितच आहेत. विशेष म्हणजे जवळपास सात लाख महिलांच्या खात्यांमध्ये विधानसभा निवडणुकीपुयों पैसे जमा झाले, मात्र पडताळणीसाठी असलेल्या २ हजार १७७ महिलांना अद्याहो लाभ मिळालेला नाही. या महिलांचे अर्ज प्रलंबितच दाखक्ति आहेत. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये नारी शक्ती पोटलंवरून ३ लाख ९८ हजार ३४१ महिलांनी अर्ज केले होते. त्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या पोर्टलवरून २ लाख ९१ हजार १५५ महिलांनी अर्ज दाखल केले होते. असे एकुण सात लाख तीन हजार ४३६ महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले. त्यापैकी ६ लाख ८९ हजार ४९६ महिलांचे अर्ज मंजूर करून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला होता. 

ladki bahin yojana update 2024 Application Form Pending

 

विविध कारणांनी ३ हजार २४२ महिलांचे अर्ज फेटाळण्यात आले, तर २ हजार ६७७ अर्ज पडताळणीमध्ये आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टपप्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहे, हजारोच्या संख्येत महिलांच्या खात्यांचे आधार सिडिंग इशले आहे, मात्र त्यांच्या खात्यात अद्यापही पैसे जमा न झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. मदत केंद्राची होत आहे मागणी अर्ज भरतेवेळी महिलांना येणाऱ्या अडवणींची सोडवणूक करण्यासाठो महिला व बालकल्याण विभागाकडून मदतकेंद्र सुरू करण्यात आले होते, मात्र त्यांनी प्रक्रिया केल्यावरही पैसे प्राप्त झाले नाही. अशांसाठी मार्गदर्शन केंद्रच उपलब्ध नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आधार सिडिंग करूनसुद्धा पेरी न मिळालेल्या अनेक महिला असून आता कुणाकडे मार्गदर्शन मागावे, असा सवाल त्या उपस्थित करित आहेत.



अन्य महत्वाचे जॉब बघा..
1 Comment
  1. सिद्धार्थ नागटिळे says

    लाडक्या बहणीच्या फ्रॉम आम्ही ऑनलाईन पद्धतीने भरला होता पण त्याचा आम्हला लाभ मिळाला नाही. तुमचा कडे काही उपाय असेल तर कळवा.🙏

Leave A Reply

Your email address will not be published.