Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


LIC चा आता आरोग्य विम्यात प्रवेश, नवीन महत्वाचे प्लॅन्स!! – LIC enters Health Insurance!

LIC Health Insurance


Telegram Group Join Now

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) लवकरच आरोग्य विमा क्षेत्रात पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी एलआयसी एका आरोग्य विमा कंपनीच्या अधिग्रहणाच्या प्रक्रियेत आहे LIC Health Insurance Latest Update Launch. कंपनीचे सीईओ सिद्धार्थ मोहंती यांनी १८ मार्च रोजी ही माहिती दिली.

LIC Health Insurance Latest Update

एलआयसीचा शेअर वाढला
या घोषणेनंतर LIC च्या शेअरमध्ये वाढ झाली असून, मंगळवारी तो १.७०% वाढून ७५८ रुपयांवर पोहोचला. व्यवहार संपताना शेअर ७५७.२० रुपयांवर बंद झाला. ३ मार्च रोजी हा शेअर ७१५ रुपयांच्या नीचांकी स्तरावर गेला होता, जो LIC साठी ५२ आठवड्यांतील सर्वात कमी होता.

३१ मार्चपूर्वी अधिग्रहणाचा अंतिम टप्पा
LIC च्या नियोजनानुसार, ३१ मार्चपूर्वी आरोग्य विमा कंपनीच्या अधिग्रहणाची अधिकृत घोषणा केली जाईल. मोहंती यांच्या मते, एलआयसीकडे अधिग्रहित कंपनीचा मोठा हिस्सा नसेल, मात्र हा निर्णय विमा क्षेत्रात LIC चं वर्चस्व वाढवेल.

प्रीमियम संकलनात वाढ
अलीकडेच LIC ने आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या ११ महिन्यांत ग्रुप अॅन्युअल रिन्युअल प्रीमियम आणि वैयक्तिक प्रीमियममध्ये मोठी वाढ नोंदवली. ग्रुप प्रीमियममध्ये २८.२९% आणि वैयक्तिक प्रीमियममध्ये ७.९०% वाढ झाली आहे.

थोडीशी घटही
फेब्रुवारी २०२५ पर्यंत एलआयसीचं एकूण प्रीमियम संकलन १.९० लाख कोटी रुपयांवर पोहोचलं, जे मागील वर्षीच्या तुलनेत १.९०% अधिक आहे. मात्र, वैयक्तिक प्रीमियम संकलन १.०७% घटून ४,८३७.८७ कोटी रुपये झाले आहे. या कालावधीत LIC ने ४,८९८ नवीन पॉलिसी जारी केल्या, जे मागील वर्षीच्या तुलनेत १३.५३% अधिक आहेत.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.