खुशखबर! लाडकी लेकीच्या खात्यात रक्कम जमा होणार! – Maharashtra Ladki Lek Yojana
Maharashtra Ladki Lek Yojana
सध्या पुण्यात जवळपास २१ लाख पेक्षा जास्त ‘लाडक्या बहिणीं’ना लाभ मिळाल्यानंतर आता सरकार लवकरच चार हजार ‘लाडक्या लेकी’च्या खात्यांवर पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी पाच हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत. मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षांची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत. हि आनंदाची बातमी आज जाहीर झाली आहे. या मुळे अर्जधारकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
राज्य सरकारने ‘माझी कन्या भाग्यश्री’ बंद करून ‘लेक लाड़की योजना नाया रचनेत आणली. ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेला प्रतिसाद कमी मिळत असल्याने त्यातील एक किंवा दोन मुत्येंची अट रद्द करून ‘लेक लाडकी’ योजनेत एक मुलगा आणि एक मुलगी असेल, तरीही मुलीला योजनेचा लाभ देण्याचे निश्चित केले आहे. एक लाख उत्पन्न असलेल्या आणि पिल्ल्या केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना योजनेचा लाभ देण्यात येतो. पुण्यात पहिल्या टप्प्यात चार हजार १७२ मुलींना पहिला टपा वर्ग करण्याचे काम सुरू आहे. एक किंवा दोन दिवसांत प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यावर पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता वर्ग करण्यात येणार आहे. गुरुवारी (ता. ५) दुपारपर्यंत काही तांत्रिक कारणांनी खात्यांवर पैसे जमा झालेले नव्हते. प्रशासनाकडून तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम सुरू होते. पुणे शहरात ७५० सामाध्यांना लाभ मिळणार आहे, तर ग्रामीण भागात सर्वाधिक कुमर तालुक्यात ५७५ लाभाथों आहेत.
असे मिळणार पेसे…
- पहिला हप्ता : मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये
- दुसरा हप्ता : इयत्ता पहिलीत सहा हजार रुपये
- तिसरा हप्ता सहावीमध्ये सात हजार रुपये
- चौधा हप्ता अकरावीत आठ हजार रुपये
- मुलाचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये
- याप्रमाणे एक लाख एक हजार एवढी रक्कम देण्यात येणार
कधीही करा अर्ज – एक एप्रिल २०२३ नंतर जन्म झालेल्या मुलींसाठी ही योजना आहे. अर्ज राज्यात कुठेही आणि कधीही करता वेतो. मुलीच्या जन्माची नोंदणी झाल्यानंतर अंगणवाडी सेविकेकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करता येतो. अंगणवाडी सेविका अर्ज ऑनलाइन भरते, त्यानंतर ऑनलाइन पडताळणी झाल्यावर प्रत्यक्षात लाभ मिळण्यास सुरुवात होईल.
योजना कशासाठी ?
- मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे शिक्षणाला चालना देणे
- मुलींचा मृत्युदर कमी करणे आणि बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे
- शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणे
आमाला पण घर कुल ध्या