आता बँक खात्यांसाठी ४ व्यक्तींना नॉमिनी ठेवण्याची परवानगी! – Now, bank accounts are allowed up to 4 nominees
Now, bank accounts are allowed up to 4 nominees

मित्रांनो, बँकिंग क्षेत्रात एक मोठा बदल झाला आहे. आता, संसदने बुधवारी बँकिंग कायदा (सुधारणा) विधेयक, 2024 ला मंजुरी दिली (Now, bank accounts are allowed up to 4 nominees). या विधेयकनुसार आता बँक खातेधारक चार नामनिर्देशित व्यक्ती (नॉमिनी) जोडू शकतात. राज्यसभेत हे विधेयक ध्वनीमताने मंजूर करण्यात आले. याआधी, डिसेंबर 2024 मध्ये हे लोकसभेतही पारित झाले होते. आता आपण आपल्या बँक खात्यासाठी ४ जणांना नॉमिनी म्हणून सेट करू शकता. हि सुविधा एक महत्वाचा अपडेट आहे.
या सुधारणेमुळे बँकिंग क्षेत्रात मोठे बदल घडतील. खातेधारकांना अधिक सुविधा मिळेल, बँकांना अधिक स्वायत्तता मिळेल, तसेच जाणीवपूर्वक कर्ज न फेडणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई होईल. या विधेयकात ‘महत्वपूर्ण हिस्सेदारी’ (सबसटांशियल इंटरेस्ट) या संकल्पनेची व्याख्या बदलण्यात आली आहे. याआधी ही मर्यादा 5 लाख रुपये होती, जी आता वाढवून 2 कोटी रुपये करण्यात आली आहे. तसेच रोख रक्कम (कॅश) आणि मुदतठेवी (फिक्स्ड डिपॉझिट) यामध्ये एकाच वेळी नामनिर्देशनाची सुविधा देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की हे विधेयक पाच वेगवेगळ्या कायद्यांवर परिणाम करेल.
सहकारी बँकांच्या संचालकांचा (अध्यक्ष आणि पूर्णकालिक संचालक वगळता) कार्यकाळ 8 वर्षांवरून वाढवून 10 वर्षांचा करण्यात आला आहे. केंद्रीय सहकारी बँकेचा (CCB) संचालक राज्य सहकारी बँकेच्या (SCB) संचालक मंडळात समाविष्ट होऊ शकेल. बँका त्यांच्या आवश्यकतेनुसार ऑडिट फी निश्चित करू शकतील. तसेच बँकांच्या नियामकीय अनुपालन अहवाल सादर करण्याच्या तारखा दर महिन्याच्या 15 आणि शेवटच्या दिवशी असतील. याआधी हा अहवाल दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारपर्यंत सादर करावा लागत होता.