Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel



महत्वाचे- पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या रिक्त पदे वाढणार, त्यामुळे भरती लवकरच!

Pashudhan Vikas Adhikari Jobs


Telegram Group Join Now

जिल्हा परिषद आणि राज्यशासनाच्या जिल्हास्तरावरील पशू विभागातील श्रेणी २ मधील पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी १ मध्ये आणले जाणार आहेत. त्या ठिकाणी पशुधन पर्यवेक्षकाऐवजी पशुधन विकास अधिकारी हे पद निर्माण केले आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत असलेले ६७ दवाखाने श्रेणी २ मधून १ मध्ये वर्ग होणार आहेत. त्यामुळे पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांची संख्या वाढणार आहे. ही पदे परिपूर्ण झाली तर नव्या निर्णयामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पशूंवर उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांची उणीव जाणवणार नाही. हि पदे लवकरच भरली जाण्याची चिन्हे आहेत. हि निश्चितच सर्वांसाठी दिलासादायक बातमी आहे हे नक्की.

Pashudhan Vikas Adhikari Jobs
जिल्हा परिषद पशू विभागाचे तालुकास्तरावर सहा चिकित्सालये आणि ग्रामीण भागात ६७ दवाखाने आहेत. तालुकास्तरावर पशुधन विकास अधिकारी नियुक्त आहेत तर पशूवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पशुधन पर्यवेक्षक कार्यरत आहेत. रिक्त पदे अधिक असल्यामुळे या दवाखान्यांचा कारभार रामभरोसेच आहे. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता ग्रामीण भागातील पाळीव जनावरांना वेळेत उपचार देण्यासाठी वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेकवेळा जनावरे मृत पडण्याची भीती असते. काहीवेळा शेतकरीच स्वतःहून उपचार करतात. शासनाकडून पशुधन विकास अधिकारीपदाची भरती जाहीर केली आहे. त्यामध्ये राज्यात २ हजार ७९५ पदे भरली जाणार आहेत. त्यातील जिल्हा परिषदेसाठीची ६७ आणि राज्य शासनाच्या ८० दवाखान्यांसाठी मिळून १४७ पशुधन विकास अधिकारी मिळावेत, अशी मागणी पशू विभागाकडे करण्यात आली आहे. ही पदे भरली गेली तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. नवीन बदलानुसार आवश्यक रिक्त पदे भरली जावीत, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. ती पदे भरली गेली तर निश्चितच ग्रामीण भागातील प्रश्न सुटणार आहेत.



अन्य महत्वाचे अपडेट्स बघा..
1 Comment
  1. Pratik Gorakh Gaikwad says

    कोणती नेकरी

Leave A Reply

Your email address will not be published.