Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


महत्वाचे! अनुसूचित युवतींसाठी मोफत सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण! – Police Army Free Training Camp 2025

Police Army Free Training Camp 2025


Telegram Group Join Now

पालघर जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षात अनुसूचित जमातीच्या युवतींसाठी मोफत सैन्य आणि पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला जाणार आहे. हे प्रशिक्षण केंद्र मोखाडा तालुक्यातील पळसुंडे येथे सुरू करण्यात येणार आहे. Police Army Free Training Camp 2025

Free pre-recruitment training for ST women in the army and police.

प्रशिक्षणासाठी निवड प्रक्रिया आणि अटी

  • निवड प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: ६ मार्च
  • शारीरिक पात्रता चाचणी: ७ मार्च
  • लेखी परीक्षा आणि अंतिम निवड यादी: ८ मार्च

पात्रता निकष:

  • किमान उंची: १५० सेमी
  • किमान वजन: ५० किलो
  • वयोमर्यादा: १८ ते २६ वर्षे
  • शैक्षणिक पात्रता: बारावी उत्तीर्ण

आवश्यक कागदपत्रे

  • शाळा सोडल्याचा दाखला
  • बारावीचे गुणपत्रक
  • जातीचा दाखला
  • अधिवास प्रमाणपत्र
  • नाव नोंदणी प्रमाणपत्र

इतर महत्त्वाची माहिती

प्रशिक्षणार्थींना भोजनाची सुविधा दिल्यानंतर प्रशिक्षण सुरू होईल. मात्र, निवड प्रक्रियेसाठी येण्या-जाण्याचा आणि राहण्याचा कोणताही भत्ता दिला जाणार नाही.

संपर्कासाठी:

 ८८३०९९३६८८ / ९९२१३४८७१५

इच्छुक युवतींनी ६ मार्च रोजी सकाळी ८ वाजता मोखाडा तालुक्यातील पळसुंडे येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जव्हार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी करिष्मा नायर यांनी केले आहे.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.