Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


Ration Card ekyc Maharashtra – ई-केवायसी नसल्यास १ नोव्हेंबरपासून रेशन बंद, शेवटची मुदत ३१ ऑक्टोबर

Ration Card ekyc Maharashtra


Telegram Group Join Now

Ration Card ekyc Maharashtra

Ration Card ekyc Maharashtra: Under the National Food Security Scheme, ration food is supplied to the poor and needy at very low rates. The government has now made it a condition for the ration card holders availing of that scheme to do e-KYC. Fake beneficiaries of the scheme will be detected through e-KYC. A deadline has been given till 31st October to complete this process and the ration food for those who have not done ‘E-KYC’ will be closed from 1st November. According to the September 23 report, 16 lakh 32 thousand 785 people on ration cards in the district have not done ‘e-KYC’. Know How to Do Ration Card ekyc Maharashtra

या’ तारखेपूर्वी रेशन कार्डचे ई-केवायसी करा, नाहीतर रेशन मिळणे होईल बंद

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब गरजूंना अत्यंत कमी दरात रेशनधान्याचा पुरवठा होतो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता सरकारने ई-केवायसी करण्याची अट घातली आहे. योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ई-केवायसी तून लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली असून ‘ई-केवायसी’ न केलेल्यांचे रेशनधान्य १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. २३ सप्टेंबरच्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील रेशनकार्डवरील १६ लाख ३२ हजार ७८५ जणांनी ‘ई-केवायसी’ केलेली नाही..

Ration Card ekyc Maharashtra

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्तातील धान्य मिळविण्यासाठी सर्व रेशनकार्डधारकांना ‘ई-केवायसी’चे बंधन घालण्यात आले आहे. अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत. मात्र, तरीदेखील अनेक शिधापत्रिकाधारकांली ‘ई-केवायसी’ची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांचे रेशन १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. तत्पूर्वी, ‘ई-केवायसी’ करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. जर शिधापत्रिकाधारकाने ३१ ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना रेशनचे धान्य मिळणार नाही. याशिवाय अशा शिधापत्रिकाधारकांची नावेही रेशनकार्डमधून वगळली जाणार असून त्या शिधापत्रिका देखील रद्द केल्या जाणार आहेत. आता पुढील ३६ दिवसांत राज्यातील चार कोटी तर जिल्ह्यातील २० लाख व्यक्तींची ‘ई-केवायसी’ करून घ्यावी लागणार आहे.

Ration Card ekyc Maharashtra

रेशनकार्डवर मोफत रेशन मिळण्याच्या योजनेसाठी अपात्र असतानाही अनेकजण स्वस्तातील धान्य घेतात. याशिवाय अनेक लोक सध्या या जगात नाहीत, ज्यांचा मृत्यू झाला आहे, मात्र अद्यापही त्यांची नावे शिधापत्रिकांमध्येच आहेत. दुसरीकडे बनावट रेशनकार्ड काढून शासकीय योजनांचा लाभ घेणारे देखील आहेत. या पार्श्वभूमीवर आता सर्व शिधापत्रिकाधारक म्हणजेच कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्यांची ज्यांची नावे नोंदलेली आहेत, त्या सर्वांना ‘ई-केवायसी’ करावीच लागणार आहे. रेशनकार्डवरील जो कोणी सदस्य मुदतीत ‘ई-केवायसी’ करणार नाही, त्याचे नाव शिधापत्रिकेतून काढून टाकले जाईल



अन्य महत्वाचे जॉब बघा..
1 Comment
  1. Ram says

    Link to kyc

Leave A Reply

Your email address will not be published.