Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


खुशखबर! भारतीय स्टेट बॅंकमध्ये १३ हजार पदे भरणार, ४७ हजारपर्यंत पगार! – SBI Clerk Lipik Bharti 2025

SBI Clerk Lipik Bharti 2025


Telegram Group Join Now

जर आपण बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांपैकी असला तर आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हजारो रिक्त पदे भरली जाणार आहेत. या बद्दलची अधिकृत जाहिरात आज प्रकाशित झाली आहे.  या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना ४७ हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. या भरतीसंदर्भात अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा,अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. मुख्य म्हणजे हि पदभरती लिपिक पदांची असून पदवीधर उमेवारांना हि एक सुवर्णसंधीच आहे. या अंतर्गत, स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये लिपिक संवर्गातील ज्युनिअर असोसिएटच्या १३००० हून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. (SBI Clerk Lipik Bharti 2025)

SBI Lipik Bharti 2025

स्टेट बॅंक ऑफ SBI Clerk Recruitment इंडियाने एकूण १३ हजार ७३५ पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे. अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५८७० पदे आहेत. त्याचप्रमाणे ओबीसी उमेदवारांसाठी ३००१ पदे रिक्त आहेत. SC उमेदवारांसाठी २११८ पदांसाठी नोकऱ्या आहेत. एसटी प्रवर्गातील १३८५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी १३६१ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. SBI ही राष्ट्रीय बॅंक असून त्याच्या भारतातील विविध राज्यांमध्ये शाखा आहेत. असे असले तरी उमेदवार फक्त एका राज्यासाठी अर्ज करू शकतो. त्यातही एक खास गोष्ट म्हणजे, तुम्ही ज्या राज्यासाठी अर्ज कराल त्या राज्याची स्थानिक भाषा कशी वाचायला, लिहायला आणि बोलता येणे आवश्यक आहे.

कोण करू शकतो अर्ज?

एसबीआयच्या ज्युनिअर असोसिएट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदवी उत्तीर्ण केलेली असावी. सध्या अंतिम वर्षात असलेले विद्यार्थी SBI भरतीसाठी अर्ज करू शकतात. तुमची पदवी ३१ डिसेंबर २०२४ पूर्वी पूर्ण केलेली असावी. या पदांसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. २० ते २८ वयोगटातील कोणताही उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतो. उमेदवाराचा जन्म २ एप्रिल १९९६ पूर्वी आणि १ एप्रिल २००४ नंतर झालेला नसावा. एससी/एसटी उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत देण्यात आली आहे.

कशी असेल निवड?

या SBI भरती सर्व SBI Clerk Recruitment उमेदवारांना प्रथम ऑनलाइन प्राथमिक परीक्षेत बसावे लागेल. यामध्ये, उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना स्थानिक भाषेची परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर, अंतिम निकाल जाहीर केला जाईल.

किती मिळेल पगार?

ज्युनिअर असोसिएट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १७ हजार ९०० रुपये ते ४७ हजार ९२० रुपये पगार मिळेल.

अर्जाची शेवटची तारीख यासाठी अर्ज प्रक्रिया SBI Clerk Recruitment सुरु झाली असून, तुम्हालाही या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही एसबीआयची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकता. ७ जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.