Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


चार धाम यात्रेला चला; प्रवासासह सारं काही मोफत ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ अर्ज करा !Tirth Darshan Yojana 2024 Maharashtra

Tirth Darshan Yojana 2024 Maharashtra


Telegram Group Join Now

Tirth Darshan Yojana 2024 Maharashtra: Eligible person will get one time benefit of this scheme for traveling to one of the designated pilgrimage sites under the scheme and the maximum limit for travel expenses is Rs 30 thousand per person. It will include actual travel, food, accommodation etc. Annual income of the beneficiary should be 2 lakh 50 thousand.

‘Tirth Darshan Yojana 2024 Maharashtra Apply Online

Tirth Darshan Yojana 2024 Maharashtra – राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांची विनामूल्य यात्रा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीद्वारे कार्यवाही होणार आहे. भारतातील एकूण ७३ व महाराष्ट्र राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. खर्चासाठी कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती ३० हजार रुपये इतकी आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास. भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल. तीर्थयात्रांना जाऊन मनःशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुखकर व्हावे, यासाठी ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची, दर्शनाची संधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून मिळणार आहे.

योजनेंतर्गत निर्धारित तीर्थक्षेत्रापैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे तसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती ३० हजार रुपये आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल. लाभार्थी वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार असावे.

Char Dham Yojana

अर्ज कुठे कराल?
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभासाठी समाज कल्याण विभागाकडे परिपूर्ण प्रस्तावासह अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. कागदपत्रांची निकषानुसार छाननी केल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाते.

अर्जासोबत कोणती कागदपत्रे हवी? Documents Required For Tirth Darshan Yojana 2024 Maharashtra

  • आधार कार्ड
  • निवास
  • प्रमाणपत्र
  • वय प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचादाखला
  • ओळखपत्र
  • आरोग्य प्रमाणपत्र
  • शिधापत्रिका
  • मोबाइल नंबर
  • बैंक पासबुक
  • पासपोर्ट साइज फोटो

या योजनेंतर्गत राज्यातील व देशातील प्रमुख १३९ तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला असून, या योजनेंतर्गत निर्धारित तीर्थक्षेत्रात पैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे. जिल्हास्तरीय समितीद्वारे होणार निवड प्रवाशांची निवड जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यातयेणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यासाठी कोटा निश्चित करून प्राप्त झालेल्या अर्जाच्या उपलब्धतेनुसार लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड करण्यात येणार आहे.



अन्य महत्वाचे जॉब बघा..
2 Comments
  1. Uamesh navale says

    अर्ज कसा करायचा?

  2. कळसे कविता राजकुमार says

    हा अर्ज घरच्या घरी भरता येणार नाही का

Leave A Reply

Your email address will not be published.