Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel



खुशखबर! आता अवघ्या एक रुपयात मिळणार व्हिसा! – Visa in Just One rupees

Visa in One rupees


Telegram Group Join Now

Visa in Just One rupees – मित्रांनो, जर आपण व्हिसा साठी अर्ज करत आहेत तर हि एक मस्त बातमी आहे. प्राप्त माहिती नुसार, युरोपियन कमिशन आणि कॉण्डे नास्ट ट्रॅव्हलरच्या अहवालानुसार, भारतीय अर्जदारांनी २०२४ मध्ये विविध देशांमध्ये परत न करण्यायोग्य व्हिसा शुल्कात एकत्रितपणे ६६४ कोटी रुपयांपेक्षा जास्त गमावले. ही धक्कादायक आकडेवारी आंतरराष्ट्रीय प्रवास नियोजनाशी संबंधित आर्थिक ताण अधोरेखित करत असल्याने अॅटलिसने व्हिसा सेल सुरू केला आहे. फक्त १ रुपयामध्ये प्रमुख जागतिक ठिकाणांना व्हिसा मिळणार आहे.

Visa in Just One rupees

४ आणि ५ ऑगस्ट या दोन दिवसांच्या सेलदरम्यान, भारतीय प्रवासी फक्त एक रुपयामध्ये यूएई, यूके, व्हिएतनाम, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इजिप्त आणि हाँगकाँग यासारख्या लोकप्रिय ठिकाणांसाठी व्हिसासाठी अर्ज करू शकणार आहेत. याव्यतिरिक्त युनायटेड स्टेट्स आणि निवडक शेंजेन देशांसारख्या प्रत्यक्ष भेटींची आवश्यकता असलेल्या देशांसाठी अपॉइंटमेंट बुकिंग देखील फक्त एक रुपयामध्ये उपलब्ध असणार आहे. यासंदर्भात अॅटलिसचे संस्थापक आणि सीईओ मोहक नाहता म्हणाले की, व्हिसा प्रक्रियेतील संघर्ष दूर करण्यासाठी अॅटलिसची स्थापना करण्यात आली होती. वन वे आऊट सेलसह आम्ही ते ध्येय आणखी पुढे नेत आहोत. या उद्योगाकडून लोकांच्या अपेक्षांना आव्हान द्यायचे आहे आणि जागतिक प्रवास खरोखरच आवाक्यात असू शकतो, हे सिद्ध करायचे आहे.



अन्य महत्वाचे अपडेट्स बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.