Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


निवृत्तीवेतन धारकांनी हयात प्रमाणपत्र सादर न केल्यास भरावा लागेल आयकर

What if a pensioner does not submit life certificate?


Telegram Group Join Now

What if a pensioner does not submit life certificate: लातूर कोषागार कार्यालयातून बँकेमार्फत निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी १ नोव्हेंबर २०२४ रोजी हयात असल्याचे प्रमाणपत्र ८ ते ३० नोव्हेंबरपर्यंत आपल्या बँक खात्यात जमा करून स्वाक्षरी घ्यावी. जिल्ह्यातील सर्व बँकेच्या शाखेत हयात प्रमाणपत्रांचे कोरे फॉर्म पाठविण्यात आले आहेत. प्रत्येक निवृत्ती वेतनधारकांनी त्या फॉर्मवर बैंक अधिकाऱ्यांसमोर स्वाक्षरी करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्ज्वला पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, कोषागारामार्फत निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतन घेत असलेल्या निवृत्तीवेतन धारकांनी भारत सरकारच्या आयकर विभागामार्फत कळविल्यानुसार आधार क्रमांकासोबत पॅन क्रमांक संलग्न लिंक करावा.

२०२४-२५ आयकर कायद्यान्वये जास्तीचा २० टक्के आयकर भरावा लागेल, याची नोंद संबंधितांनी घ्यावी, असेही आवाहन कोषागार अधिकारी डॉ. उज्ज्वला पाटील यांनी केले आहे



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.