Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


या महिण्यात पैसे गुंतवण्यास मिळणार सुवर्णसंधी, अनेक नवीन IPO येणार – May 2024 New IPO List

May 2024 New IPO List


Telegram Group Join Now

May 2024 New IPO List – मे महिन्यात शेअर बाजारात ‘प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावां’चा वर्षाव होणार असून, याद्वारे कंपन्या दहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम उभी करणार आहेत. डिजिटल सेवा संस्था इंडेजीनचा आयपीओ ६ मे रोजी उघडणार आहे. आधार हाउसिंग फायनान्स व ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी टीबीओ टेकचा आयपीओ ८ मे रोजी उघडणार आहे. निवडणूक काळात आयपीओ कमी येतात. यंदा मात्र मागील ४ लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत ७ पट अधिक आयपीओ आलेत. गुंतवणूकदारांतील उत्साह, जबरदस्त जीडीपी वृद्धी दर आणि भारताबाबतचा सकारात्मक कल यामुळे यंदा निवडणूक काळात आयपीओ वाढले आहेत.

New IPO in May 2024

  • विन्सोल इंजिनिअर्स : या एसएमई कंपनीचा २३.३६ कोटी रुपयांचा आयपीओ ६ ते ९ मे या काळात खुला असेल. इश्यू प्राइस ७१ ते ७५ रुपये आहे.
  • स्लोन इन्फोसिस्टम्स: या कंपनीचा ११ कोटींचा आयपीओ ३ ते ७ मे दरम्यान खुला असेल. इश्यू प्राइस ७९ रुपये आहे.
  • रीफ्रँक्री शेप्स : या कंपनीचा १८.६ कोटी रुपयांचा आयपीओ ६ ते ९ मे दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. इश्यू प्राइस २७ ते ३१ रुपयांदरम्यान असेल.
  • फाइनलिस्टिंग्ज टेक: हा १३.५३ कोटींचा आयपीओ ७ मे ते ९ मे दरम्यान चालेल. इश्यू प्राइस १२३ रुपये असेल.


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.