Write A Book And Get A Grant


Telegram Group Join Now

Write A Book And Get A Grant

Write A Book And Get A Grant: The Writer Grant Scheme is implemented by Sahitya and Sanskriti Mandal to encourage budding writers. Novel writers who have not published any book under this scheme are considered to be eligible for a literary grant after submitting an application for the benefit of the scheme for the publication of stories, novels, fine prose, poetry, plays (one-act plays), children’s books and the publisher is considered eligible for book publication. Novel writers’ books are published with a 75 percent subsidy. Along with this, according to the type of literature, the respective writers, and poets are given remuneration.

नवोदित लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी साहित्य व संस्कृती मंडळातर्फे नवलेखक अनुदान योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत ज्यांचे एकही पुस्तक प्रकाशित झाले नाही, अशा नवलेखकांना कथा, कादंबरी, ललित गद्य, काव्य, नाटक (एकांकिका), बालवाङ्गय या लेखनाच्या प्रकाशनासाठी नवलेखकाने योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर केल्यानंतर तज्ज्ञ साहित्यिकांच्या अनुकूल अभिप्रायानंतर लेखन साहित्य अनुदानास पात्र मानले जाते व पुस्तक प्रकाशनासाठी प्रकाशकाला ७५ टक्के अनुदान देऊन नवलेखकांचे पुस्तक प्रकाशित केले जाते. यासोबत साहित्य प्रकारानुसार संबंधित लेखक, कवींना मानधन दिले जाते.

Grants are available for this type:

नवलेखकांचे कवितासंग्रह, कथासंग्रह, नाटक/एकांकिका, कादंबरी, ललितगद्य, बालवाङ्यय, इतर प्रकारचे वैचारिक, तसेच चरित्र, आत्मचरित्र, ललित स्वरूपाचे, प्रवास वर्णनात्मक लेखनासाठी साहित्य व संस्कृती मंडळातर्फे अनुदान दिले जाते.

Who gets the grant?: 

या योजनेअंतर्गत ज्यांचे एकही पुस्तक प्रकाशित झाले नाही, अशा महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील केवळ मराठी नवलेखकांना त्यांच्या साहित्य प्रकाराच्या पृष्ठसंख्येनुसार अनुदान दिले जाते. अशा लेखकांनी मंडळाकडे लेखन साहित्य सादर केल्यानंतर त्या त्या वाद्यय प्रकारातील तज्ज्ञांकडे अभिप्रायासाठी पाठविले जाते. त्यांच्याकडून अनुकूल अभिप्राय आल्यानंतरच संबंधित लेखक अनुदानास पात्र ठरतात.

How much is the grant?: 

अनुदानप्राप्त ठरलेल्या नवलेखकांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मंडळाने रास्त ठरविलेल्या निर्मिती खर्चाच्या ७५ टक्के अनुदान प्रकाशकाला देऊन मंडळाद्वारे पुस्तक प्रकाशित करण्यात येते.
– पात्र ठरलेल्या पुस्तकाच्या केवळ ५०० प्रती छापण्यासाठी अनुदान देण्यात येते.
– या योजनेतील प्रकाशित पुस्तकाच्या ५० प्रती लेखकाला देण्यात येतात. यापेक्षा अधिक प्रती हव्या असल्यास लेखकाने एकाच वेळी १० प्रती खरेदी कराव्या, ज्यात २५ टक्के सवलत देण्यात येईल.
– याशिवाय या नवलेखकांना प्रकाशकांकडून काव्यसंग्रहासाठी ७५० रुपये, नाटक/एकांकिकासाठी ७५० रुपये, ललितगद्य/वैचारिक व कथासंग्रहासाठी १००० रुपये, कादंबरीसाठी १५०० रुपये तर बालवाङ्झ्यासाठी ७५० रुपये मानधन देण्यात येते.

How to apply?: 

महामंडळाकडे अनुदानासाठी पाठवायचे (टाइप केलेले) साहित्य स्वच्छ, शुद्ध, सुवाच्च व प्रचलित शुद्धलेखनानुसार कागदाच्या एका बाजूस टाइप केलेले असावे.
• प्रस्तावना, अनुक्रमणिका, एकूण लेखनाची पृष्ठसंख्या आदी गोष्टींची पूर्तता करून साहित्य व्यवस्थित बांधून पाठवावे.
• टाइप केलेल्या साहित्य प्रतीवर पुस्तकाचे नाव, साहित्य प्रकार, लेखकाचा पत्ता असे काही नसावे.
या सर्व गोष्टी लेखकांनी वेगळ्या कागदावर टाइप करून मंडळाला पाठवावे.
• साहित्याची केवळ एक प्रत नोंदणी डाकेने मंडळाकडे पाठवावी. साहित्य स्वतंत्र असावे व तसे असल्याबद्दलची लेखी हमी लेखकाने मंडळाला द्यावी.
• अनुदानास पात्र न ठरलेल्या लेखकाची साहित्य प्रत साहित्य मंडळ परत पाठवित नाही. त्यामुळे लेखकांनी आपल्या लेखनाची एक प्रत स्वत:जवळ ठेवावी.

नवलेखक अनुदान योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक नवलेखकांनी साहित्य व संस्कृती मंडळाच्या वेबसाइटवर जाऊन सविस्तर माहिती घ्यावी व त्याप्रमाणे अनुदानासाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने यांनी केले.

 



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.