नवोदयच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, जवाहर नवोदय विद्यालयात सहावीमध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेची तारीख १८ जानेवारी २०२५ – navodaya vidyalaya admission 2024

navodaya vidyalaya admission 2024


Telegram Group Join Now

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नवोदय विद्यालय समितीने २०२५- २६ या वर्षासाठी जवाहर नवोदय विद्यालयातील सहावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. अधिसूचनेनुसार सहावीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या निवड चाचणीसाठी १६ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. जवाहर नवोदय विद्यालयात ज्यांना पुढील वर्षी प्रवेश घ्यायचा आहे, त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. पालकांना एनव्हीएमच्या अधिकृत वेबसाईट navodaya.gov.in ला भेट देऊन अर्ज भरता येणार आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर पालकांना प्रथम नोंदणी करावी लागेल, आयडी आणि पासवर्ड याचा वापर करून लॉगिन केल्यानंतर पालक आवश्यक तपशील भरून आणि आवश्यक कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी अपलोड करून नोंदणी करू शकतील.

जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांना सहावीमध्ये प्रवेश हा नवोदय विद्यालय निवड प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून दिला जातो. यावर्षीच्या पाचवीतील मुलांना जवाहर नवोदय विद्यालयात सहावीमध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेची तारीख १८ जानेवारी २०२५ आहे. ही परीक्षा विद्यालयाने निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्रावर निश्चित करण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा अर्ज ऑनलाईन पद्धतीने निःशुल्क भरण्याची सुविधा https://navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर आहे. पात्र विद्याथ्यर्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष विद्यालय व्यवस्थापन समिती जवाहर नवोदय विद्यालय, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

Navodaya vidyalaya admission 2024



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.