Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 GR – ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-२०२४’ च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाच वर्षे मोफत वीज;

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 GR


Telegram Group Join Now

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 PDF

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 GR: The government decision (GR) to provide free electricity for the next five years to farmers who consume agricultural electricity up to 7.5 HP in the state was taken on Thursday. This scheme will be applicable from April 2024 to March 2029. 44 lakh three thousand farmers will benefit from this scheme.

After the completion of three years of the scheme “Mukhyamantri Baliraja Free Electricity Yojana 2024”, it will be reviewed and a decision will be taken to implement the scheme in the next period, the GR said. Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar, while presenting the budget in the monsoon session of the legislature, announced the decision to provide free electricity to agricultural pumps to farmers.

जागतिक हवामानातील बदल आणि पर्जन्यमानातील अनियमितेमुळे राज्यातील कृषी व्यवसायावर होणाऱ्या विपरीत परिणामापासून शेतकरी बांधवांना वाचविण्यासाठी राज्य शासन सदैव प्रयत्नशील व कटिबद्ध आहे. याच अनुषंगाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाने 25 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024’ अंमलात आणले आहे. तसेच या संदर्भातील नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल किंवा  टेलिग्राम चॅनेल जॉईन करा 

Mukhyamantri Baliraja Free Electricity Yojana 2024

योजनेचे नाव मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना
सुरुवात 2024
लाभार्थी राज्यातील शेतकरी
लाभ मोफत वीज
राज्य महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या वेळी 10/8 तास किंवा दिवसा 8 तास थ्री फेज वीजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्यासाठी शासनाने राज्यातील 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाणार आहे. यासाठी साधारण 14 हजार 760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana Last Date To Apply

योजनेचा कालावधी : ही योजना पाच वर्षांसाठी म्हणजेच एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु 3 वर्षांच्या कालावधीनंतर या योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana Eligibilty

पात्रता : राज्यातील 7.5 अश्वशक्ती पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील.

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana Start Date

योजनेची अंमलबजावणी : एप्रिल 2024 पासून 7.5 अश्वशक्ती पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे. शासनास विद्युत अधिनियम 2003, कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर या वीजदर सवलती पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रीम स्वरुपात वर्ग करण्यात येईल. सध्या देण्यात येणारी वीजदर सवलत रुपये 6 हजार 985 कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये 7 हजार 775 कोटी असे वार्षिक वीजदर सवलती पोटी प्रतिवर्षी रु. 14 हजार 760 कोटी  शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येणार आहेत. या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीस शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल. तसेच मागेल त्याला सौर कृषिपंप देण्याचे धोरणदेखील शासनाकडून ठरविण्यात आले आहे. ही योजना राबविण्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण कंपनीची असणार आहे.

Download CM Baliraja Mofat Vij Yojana GR



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.