Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


मोफत तीन सिलिंडरसाठी ई-केवायसीचे बंधन | How to do ujjwala yojana e kyc online

How to do ujjwala yojana e kyc online


Telegram Group Join Now

How To Do Ujjwala Yojana E Kyc Online

How to do ujjwala yojana e kyc online: प्रधानमंत्री उज्वला योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. प्रतिसिलिंडर ८३० रुपये अनुदान थेट त्यांच्या बैंक खात्यात जमा होणार आहे. जिल्ह्यात सध्या ८९ गॅस वितरक असून ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, त्यांनी गॅस वितरकांकडून करून घ्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी केले आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वर्षातून तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी अगोदर स्वखर्चाने गॅस सिलिंडर खरेदी करावे लागेल त्यानंतर लाभार्थीच्या बँक खात्यात त्याची रक्कम शासनाच्या गॅस कंपनीकडून वर्ग करण्यात येणार आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री उज्वला योजनेचे एक लाख ६९ हजार ३४ लाभार्थी असून त्यांना केंद्र शासनाकडून ३०० रुपये तर राज्य सरकारकडून ५३० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. मुख्यमंत्री अनपूर्णा योजनेसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी देखील पात्र आहेत. जिल्ह्यात ५ लाख ८६ हजार ५०९ लाभार्थी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरले आहेत. प्रधानमंत्री उज्वला योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थीनी ई-केवायसी पूर्ण करणे अपेक्षित आहे. ई-केवायसी प्रक्रिया लाभार्थ्यांना आपल्या गॅस एजन्सीमार्फत करता येणार असून ते पूर्णपणे मोफत आहे. लाभार्थ्यांना काही अडचण असल्यास जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय किंवा अनधान्य वितरण अधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी केले आहे.

ऑगस्ट अखेर ई-केवायसीची मुदत

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थीना ई- केवायसीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी लागणार आहे. गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी तशा सूचना केल्या आहेत. ई-केवायसीची प्रक्रिया लाभार्थ्यांनी गॅस एजन्सीत जाऊन ऑगस्ट अखेर पूर्ण करून घ्यावी, अन्यथा लाभार्थ्यांना लाभ देण्यास अडचणी येतील, असेही . कळविण्यात आले आहे

Download ujjwala yojana e kyc PDF Form



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.