Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


‘पीएनजी ज्वेलर्स’चा आयपीओ मंगळवारी | P N Gadgil Jewellers IPO

P N Gadgil Jewellers IPO Date, Price, GMP, Review, Details


Telegram Group Join Now

P N Gadgil Jewellers IPO

P N Gadgil Jewellers IPO: महाराष्ट्रातील लोकप्रिय दागिने निमति ‘पीएनजी ज्वेलर्स चा अकराशे कोटी रुपयांचा आयपीओ सौरभ गाडगीळ दहा ते बारा सप्टेंबर दरम्यान बाजारात येत आहे. त्यासाठी प्रति शेअर ४५६ ते ४८० रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओमध्ये किमान ३१ शेअरसाठी अर्ज करावा लागेल. त्यापेक्षा जास्त शेअर हवे असल्यास ३१ च्या पटीतच शेअरसाठी अर्ज करावा लागेल.

बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांना नऊ सप्टेंबर रोजी बोली लावता येईल. या आयपीओमधून मिळणाऱ्या निधीचा वापर ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे महाराष्ट्रात दागिन्यांची बारा नवी दुकाने उघडण्यासाठी; तसेच कर्जफेडीसाठी व कंपनीच्या सर्वसाधारण उद्दिष्टांसाठी वापरली जाईल, असे पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी सांगितले.
कंपनीचा महसूल गेली तीन वर्षे दरवर्षी ५४ टक्के दराने वाढतो आहे. सध्या पीएनजी ज्वेलर्सची २१ शहरांमध्ये ३८ दुकाने असून, एक दुकान अमेरिकेतही आहे. त्यांचा मागील वर्षीचा महसूल साडेचार हजार कोटी रुपये, तर यावर्षीचा महसूल सहा हजार १०० कोटी रुपये होता. त्यांचा मागील वर्षीचा निव्वळ नफा ९३ कोटी रुपये, तर यावर्षांचा निव्वळ नफा १५४ कोटी रुपये होता.
“आमची सर्व दुकाने नफ्यात असून, सध्या आम्ही संघटित दागिने निमति क्षेत्रातील महाराष्ट्रातील दुसरे सर्वांत मोठे निमति असून, लवकरच आम्हाला पहिले स्थान मिळवायचे आहे. त्यानंतर महाराष्ट्रालगत असलेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या हिंदी भाषिक पट्ट्यात आम्ही हळूहळू विस्तार करू. पुढची दहा वर्षे भारताच्या विकासाची असून, त्याचा फायदा घेऊन आम्ही सातत्यपूर्ण विकास करून नफा वाढवू, “असेही सौरभ गाडगीळ म्हणाले.

P N Gadgil Jewellers IPO Timeline (Tentative Schedule)

IPO Open Date Tuesday, September 10, 2024
IPO Close Date Thursday, September 12, 2024
Basis of Allotment Friday, September 13, 2024
Initiation of Refunds Monday, September 16, 2024
Credit of Shares to Demat Monday, September 16, 2024
Listing Date Tuesday, September 17, 2024
Cut-off time for UPI mandate confirmation 5 PM on September 12, 2024

P N Gadgil Jewellers IPO Lot Size

Application Lots Shares Amount
Retail (Min) 1 31 ₹14,880
Retail (Max) 13 403 ₹193,440
S-HNI (Min) 14 434 ₹208,320
S-HNI (Max) 67 2,077 ₹996,960
B-HNI (Min) 68 2,108 ₹1,011,840


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.