शिक्षकांना मोठा दिलासा! सरकारचा निर्णय; UGC स्केल लागू, वेतन-DA मध्ये भरघोस वाढ – Maharashtra Shikshak Bharti
Shikshak Bharti Latest Updates
Maharashtra Shikshak Bharti – Shikshak Bharti Latest Updates – Hello Friends, Latest New update about shikshak Bharti & Shikshak News Updates is out about their Salaries!! Its really a great news for all Teachers in Maharashtra State. Significant and welcome news has emerged regarding the higher education sector in the state. The State Government has finally taken a major decision by giving the green signal to the demands of teachers at ‘Adarsh Mahavidyalayas‘ (Model Colleges). In a recently concluded Cabinet meeting, approval was granted to implement the Basic Pay—in accordance with the UGC scale—as well as the Dearness Allowance (DA) and other allowances for teachers across seven Adarsh Mahavidyalayas. Consequently, the long-pending issue regarding teachers’ salaries—which had remained unresolved for many years—has finally been resolved. This Cabinet decision ensures that teachers at these seven Adarsh Mahavidyalayas will receive Basic Pay, Dearness Allowance, and other benefits corresponding to the UGC scale for the post of Assistant Professor, thereby facilitating a significant improvement in their financial status. Furthermore, the path has now been cleared for these teachers to receive 10 additional marks in future recruitment processes conducted by the Department of Higher and Technical Education.
राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रासाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने अखेर आदर्श महाविद्यालयांतील शिक्षकांच्या मागण्यांना हिरवा कंदील देत मोठा निर्णय घेतला आहे. नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सात आदर्श महाविद्यालयांतील शिक्षकांना UGC स्केलनुसार मूळ वेतन (Basic Pay) तसेच महागाई भत्ता (DA) आणि इतर भत्ते लागू करण्यास मंजुरी देण्यात आली. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे सात आदर्श महाविद्यालयांतील शिक्षकांना सहायक प्राध्यापक पदावरील युजीसी स्केलनुसार मूळ वेतन, महागाई भत्ता आणि अन्य भत्ते मिळणार असून शिक्षकांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होण्यास मदत होणार आहे. याशिवाय, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या भविष्यातील पदभरती प्रक्रियेत या शिक्षकांना १० अतिरिक्त गुण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आतापर्यंत अनेक शिक्षक तासिका तत्त्वावर किंवा मर्यादित वेतन श्रेणीत काम करत होते मात्र आता सहाय्यक प्राध्यापकांच्या UGC स्केलनुसार वेतन मिळणार आहे. DA वाढीमुळे प्रत्यक्ष हातात येणाऱ्या पगारात लक्षणीय वाढ होणार आहे. याविषयाबाबत अनेक शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निर्णयानुसार उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर केला होता, त्याला मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे “Equal Work, Equal Pay” या तत्त्वाला बळ मिळालं आहे. शिक्षक संघटनांनी या निर्णयाचं स्वागत करत “यामुळे शिक्षकांचा आत्मविश्वास वाढेल आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
ही सात आदर्श महाविद्यालये राज्यातील विविध जिल्ह्यांत आहेत. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात या निर्णयाचा थेट परिणाम उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर होणार आहे. राज्य सरकारचा हा निर्णय शिक्षकांसाठी गेमचेंजर ठरणार आहे. जालना जिल्ह्यात घनसांवगी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्याशी संलग्न), बुलढाणा (संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती), रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन (श्रीमती नाथीबाई दामोदार ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई), हिंगोली (स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड), गडचिरोली (गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली), रत्नागिरी जिल्ह्यात आंबवडे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळेरे येथे (मुंबई विद्यापीठ मुंबई, संलग्न) अशी सात आदर्श महाविद्यालये आहेत.


