Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करण्यास ३१ ऑक्टोबरपर्यत मुदतवाढ – Mukhyamantri Vayoshri Yojana Last Date

Mukhyamantri Vayoshri Yojana


Telegram Group Join Now

Mukhyamantri Vayoshri Yojana- राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत अर्ज स्विकारण्यासाठी दि. ३१ ऑक्टोबरपर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

mukhyamantri vayoshri yojana

आता महाराष्ट्र वयोश्री योजना, जेष्ठांना मिळणार सरळ खात्यात ३ हजार रुपये!

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा दि. ६ फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जगण्यासाठी त्यांच्या वयोमानपरत्वे योणान्या अंपगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने / उपकरणे (उदा: चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हिल चेअर, फोल्डिग वॉकर, कमोड खुर्ची, नि-बेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी.) खरेदी करण्याकरिता राज्य शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु केलेली असून पात्र रक्कम तीन हजार रुपये पर्यंतची रक्कम साहित्य खरेदीसाठी महाडिबीटीद्वारे त्यांचे बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.