Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


तुमच्या खात्यात 5500₹ कि 2500₹ जमा झाले का? दिवाळी बोनस मिळाला का?

ladki Bahin Diwali Bonus Deposit


Telegram Group Join Now

 

सध्या लाडक्या बहीण योजनेचा नवीन महत्वाचा अपडेट समोर आला आहे. सध्या सगळीकडे निवडणुकी आणि दिवाळीची धामधूम सुरु आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यात दिवाळीला 5500 रुपये दिवाळी बोनस जमा होणार होता?, आता दिवाळीला केवळ एकच दिवस शिल्लक आहे. तुमच्या खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस जमा झाला का?  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात 5500 रुपये दिवाळी बोनस जमा केला जाणार असल्याचे वृत्त होते. काही माध्यमांमध्ये असा दवा केला जात होता कि सरकारकडून लाडकी बहीण योजनेतील दिवाळी बोनस साठी पात्र असणाऱ्या महिलांची एक यादी (Majhi Ladki Bahin Yojana Diwali Bonus List) प्रसिद्ध केली जाणार आहे आणी फक्त त्या यादीत नाव असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस जमा केला जाणार आहे. 

 

ladki Bahin Diwali Bonus Deposit

 

पण वास्तविक, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याच्या बातमीला कोणताही अधिकृत दुजोरा मिळाला न्हवता. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट https://ladakibahin.maharashtra.gov.in वर देखील याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली न्हवती. तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनीही या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीवर महाराष्ट्रातील माता भगिनींनी विश्वास ठेवून कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन केले होते.



अन्य महत्वाचे जॉब बघा..
1 Comment
  1. Seema Bismilla Tadvi says

    Auguest mahinyat From Bharala Ladali Bahanacha Approval Zala Pan Ek rupaya Dekhil Ala Nahi Vidhava Ledig Sathi pan Yojana Ahe Na

Leave A Reply

Your email address will not be published.