IRCTC कडून पर्यटन योजनांची घोषणा; ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची संधी | IRCTC Baba Saheb Ambedkar Yatra Train Details

IRCTC Baba Saheb Ambedkar Yatra Train Details


Telegram Group Join Now

IRCTC Baba Saheb Ambedkar Yatra Train Details: इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) ने बौद्ध आणि शीख समुदायासाठी खास पर्यटन योजनांची घोषणा केली आहे, ज्याची सुरुवात नोव्हेंबरच्या अखेरीस होणार असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले. आयआरसीटीसीने ‘भारत गौरव टुरिझम ट्रेन’ द्वारे ‘बाबासाहेब आंबेडकर यात्रा’ या विशेष सहलीचे आयोजन केले आहे. या यात्रेला पुण्याहून १२ डिसेंबर रोजी प्रारंभ होईल. यात्रेदरम्यान पुण्याहून दादरच्या चैत्यभूमीला भेट दिली जाईल आणि नंतर मध्य प्रदेशातील महू, बोधगया, नालंदा, राजगिरी, वाराणसी, सारनाथ, नागपूर आणि पुणे या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या महत्त्वाच्या स्थळांना भेट देण्यात येईल.

यात्रेच्या माध्यमातून प्रवाशांना सामाजिक न्यायाचे आद्यप्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी आणि बौद्ध धर्माशी संबंधित ठिकाणांचे दर्शन घेता येणार आहे. इच्छुक प्रवाशांनी आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर बुकिंगसाठी अर्ज करावा, असे आवाहन आयआरसीटीसीकडून करण्यात आले आहे.

आयआरसीटीसीने शीख समुदायासाठी एक अनोखी पर्यटन योजना जाहीर केली आहे, ज्यामध्ये भारत गौरव रेल्वेद्वारे पाच प्रमुख गुरुद्वारांचे दर्शन घेता येईल. हा दौरा ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, ९ रात्री आणि १० दिवस चालेल. या योजनेत प्रवाशांना नांदेड येथील श्री हजूर साहिब, पाटणा येथील श्री हरमंदिर जी साहिब, आनंदपूर येथील श्री केशगड साहिब, अमृतसर येथील श्री अकाल तख्त साहिब, आणि बठिंडा येथील श्री दमदमा साहिब यांसारख्या पवित्र स्थळांना भेट देता येईल.

यात्रेचा प्रारंभ सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथून होणार आहे. ‘बाबासाहेब आंबेडकर यात्रा’ दौऱ्याप्रमाणेच, हा दौरा यात्रेकरूंना त्यांच्या धर्माशी संबंधित ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची संधी देतो.

भाडे किती आहे?

हे पॅकेज 17,425 रुपयांपासून सुरू होते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार ट्रेनचा स्लीपर क्लास, सेकंड एसी आणि थर्ड एसी निवडू शकता. जर तुम्ही इकॉनॉमी श्रेणी (स्लीपर क्लास) मध्ये प्रवास केला तर तुम्हाला 17,425 रुपये मोजावे लागतील. तुम्ही कम्फर्ट श्रेणी (सेकंड एसी) पॅकेज घेतल्यास, तुमच्याकडून प्रति व्यक्ती ३४,१८५ रुपये आकारले जातील. त्याच वेळी, मानक श्रेणीसाठी (थर्ड एसी) प्रति व्यक्ती 25,185 रुपये खर्च करावे लागतील. IRCTC वेबसाइट irctctourism.com ला भेट देऊन प्रवासी या टूर पॅकेजसाठी बुकिंग करू शकतात.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.