Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


कोटक ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक फंड दाखल | Kotak Transportation & Logistics Fund NFO Details

Kotak Transportation & Logistics Fund NFO Details in Marathi


Telegram Group Join Now

Kotak Transportation & Logistics Fund NFO Details: कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने कोटक ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक फंड ही नवी फंड योजना आज दाखल केली. ही योजना नऊ डिसेंबर रोजी बंद होईल. हा फंड परिवहन आणि मालवाहतूक क्षेत्रांशी संबंधित असून, तो ओपनएन्डेड श्रेणीतील आहे. या फंडाचे व्यवस्थापन नलिन भट्ट करणार आहेत. गुंतवणूकदार किमान शंभर रुपये आणि त्यानंतर कितीही रक्कम नऊ डिसेंबरपर्यंत या योजनेत गुंतवू शकतात.

परिवहन आणि मालवाहतूक क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर आणि शेअर संबंधित पर्यायांमध्ये हा फंड गुंतवणूक करणार असून दीर्घकालीन भांडवली वाढ निर्माण करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेमुळे गुंतवणूकदारांना देशातील वाढत्या वाहतूक आणि मालवाहतूक संकल्पनेत गुंतवणुकीची संधी मिळणार असून, लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांतील गुंतवणुकीसह विविध बाजार भांडवलांमध्ये गुंतवणुकीची लवचिकता यात मिळणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे. वाहनांची वाढती मालकी आणि दरडोई जीडीपी वाढल्याने इलेक्ट्रिक वाहनांकडे सुरू झालेली वाटचाल आदी कारणे या क्षेत्राच्या वाढीमागे आहेत.

भारतमाला आणि गतिशक्तीसारखे प्रमुख सरकारी उपक्रम, कार्यक्षमतेत अधिकाधिक सुधारणा हे घटक मालवाहतूक क्षेत्रातील व्यवसायाच्या संधींचा आणखी विस्तार करतील. उत्पादन क्षेत्रासह वाहतूक आणि मालवाहतूक उद्योगसुध्दा लक्षणीय विस्तारासाठी सज्ज आहे, असे कोटक महिंद्रा एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शहा यांनी सांगितले.

Details of Kotak Transportation & Logistics Fund

फंडाचे नाव कोटक ट्रान्सपोर्टेशन एन्ड लोजिस्टिक्स फंड – डायरेक्ट (G)
फंड प्रकार ओपन एन्डेड
श्रेणी इक्विटी – थिमॅटिक
NFO उघडण्याची तारीख 25-Nov-24
NFO समाप्ती तारीख 09-Dec-24


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.