नवीन प्लॉट विकत घेण्यात कोणता फायदा, जाणून घ्या! – Land Plot Investment 2025
Land Plot Investment 2025
ग्रा प्लॉट खरेदीचं आकर्षण आजही कायम आहे. छोटा का होईना एखादा प्लॉट घ्यावा आणि त्यावर टुमदार बंगला बांधावा, अशी अनेकांची इच्छा असते. अर्थात सर्वांनाच ते शक्य होत नसलं तरी प्लॉट खरेदी करणाऱ्यांचे आकडे वाढतेच आहेत. विशेषतः कोव्हिड-१९ महामारीनंतर प्लॉटखरेदीत वाढ झालेली पाहायला मिळते. गुंतवणुकीचा खर्च कमी आणि परतावा जास्त असल्यामुळे जमीन हा सर्वात लोकप्रिय गुंतवणूक पर्याय ठरतो. म्हणूनच भारतात प्लॉटमध्ये गुंतवणूक करणं, हा नेहमीच लोकप्रिय पर्याय राहिला आहे.
प्लॉट्मधल्या गुंतवणुकीचे फायदे
प्लॉटमधली गुंतवणूक ही आयुष्यात खूप कामी येते. ही एक अशी संपत्ती वा मालमत्ता आहे जिचा वापर कधीही केला जाऊ शकतो. प्लॉटमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत. गुंतवणूक मूल्य कमी निवासी मालमत्तांच्या तुलनेत जमिनीच्या किमती तुलनेने खूप कमी असतात. त्यामुळे ही तशी स्वस्त आणि चांगली भांडवली गुंतवणूक आहे. ज्यांचं बजेट कमी आहे, त्यांच्यासाठी जमीन वा प्लॉट हा गुंतवणूक पर्याय उत्तम आहे. अधिक परतावाभारतात जमीन किवा प्लॉटमधून नेहमीच चांगला परतावा मिळाला आहे. चांगल्या पायाभूत सुविधा असलेल्या ठिकाणी जमीन वा प्लॉट असल्यास, त्याची किंमत अधिक मिळते. परिणामी तुम्हाला अधिक दराने परतावा मिळतो. जमिनीतली गुंतवणूक पैशाची बचत करते आणि भविष्यात उच्च परताव्याची हमी देते.
प्लॉटमधल्या गुंतवणुकीचे फायदे
• ज्या किमतीत प्लॉट खरेदी केला जातो, त्याच किमतीला त्याचा ताबा मिळतो.
• प्लॉटवर मालमत्ता कर कमी लागतो.
• देखभाल खर्च करावा लागत नाही.
• प्लॉटमधील गुंतवणूक मर्यादित असते.
• जमिनीचे भाव अधिक गतीने आणि पटीने वाढतात.
लवचीकता मनासारखं घर बांधण्याचा उत्तम मार्ग म्हणजे प्लॉट खरेदी करणं, प्लॉटवर आपल्या बजेट आणि आवडीनुसार, घराची रचना आणि बांधकाम करू शकता. या कामात कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं. गृहबांधणीत हवे तिथे, हवे तेव्हा बदल करता येतात. स्वतःच्या घरात लोक दीर्घकाळ वास्तव्य करतात, त्यामुळे प्लॉट असेल तर कुटुंबातल्या सर्वांना आवडणाऱ्या सर्व गोष्टींचा अंतर्भाव करून मनासारखं घर बांधता येत. प्लॉटवर घर बांधायचं नसेल, तर जो व्यावसायिक किंवा निवासी मालमत्ता बांधू इच्छितो, त्याला तो प्लॉट विकू शकता. त्यातून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. भांडवल आणि नफा प्लॉटमधल्या गुंतवणुकीसाठी एकाच वेळी मोठी रक्कम लागत नाही. एखाद्या चांगल्या लोकेशनला मर्यादित स्वरूपात केलेली दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच चांगला परतावा मिळवून देते. पुढल्या पिढ्यांसाठी मुलांसाठी वा पुढच्या पिढीसाठी जमिनीचा एखादा छोटासा तुकडा वा प्लॉट घेऊन ठेवण्याचा विचार अनेकजण करतात. मुलांची लग्न वा उच्च शिक्षणाचा विचार करूनही काहीजण एन.ए. प्लॉट घेऊन ठेवतात. जमिनीतली गुंतवणूक ही आयुष्यात खूप कामी येते.