लाडकी बहिण योजनेत मोठा बदल, जाणून घ्या काय झाले नवीन अपडेट्स!
Ladki Bahin Yojana New Updates

महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’त सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे या योजनेचा लाभ घेत असलेल्या अनेक महिलांना धक्का बसणार आहे. फडणवीस सरकारने लाभार्थी महिलांच्या कागदपत्रांची सखोल पडताळणी सुरू केली असून, ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्या महिलांना अपात्र घोषित केले जात आहे. उत्पन्न तपासणीसाठी आयकर विभागाची मदत घेतली जात आहे. Ladki Bahin Yojana New Updates
महत्त्वाचे मुद्दे:
5 लाख महिलांना अपात्र घोषित
2 कोटी महिलांना या योजनेचा लाभ
नवीन पात्रता निकषांची काटेकोर अंमलबजावणी सुरू
2 कोटी महिलांना मिळाला फायदा!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने 2024 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही योजना जाहीर केली होती. योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना मदत करणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेला राज्यातील महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत सुमारे 2 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
5 लाख महिलांना अपात्र ठरविण्याचा निर्णय!
महायुती सरकारने योजनेचा लाभ गरजू महिलांपर्यंतच पोहोचावा यासाठी उत्पन्नाच्या निकषांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळेच सुमारे 5 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. ही पडताळणी प्रक्रिया अद्याप सुरूच असून, पुढील काही आठवड्यांत आणखी काही महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे.
नवीन पात्रता निकष लागू!
सरकारने ही योजना गरजू महिलांसाठीच मर्यादित ठेवण्याच्या हेतूने नवीन पात्रता निकषांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे योजनेचा लाभ फक्त खरंच गरजू असलेल्या महिलांनाच मिळणार आहे.
महत्त्वाची सूचना: जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल, तर तुमच्या उत्पन्नाशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. अधिकृत माहिती आणि अद्ययावत अपडेटसाठी सरकारी संकेतस्थळाला भेट द्या.