जागतिक अपडेट! – उत्तम परताव्यामुळे गुंतवणूकदारांचा भारताला प्राधान्य!
Indian FDA Investements 2025 Update

भारतीय भांडवली बाजारातील आकर्षक परताव्यामुळे परदेशी वित्तीय संस्थांचा भारतातील सहभाग वाढला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी दिली. Indian FDA Investements 2025 Update
सध्या भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार दिसून येत आहेत. यावर भाष्य करताना सीतारामन म्हणाल्या की, गुंतवणूकदार भारतात चांगला परतावा मिळाल्याने गुंतवणूक करत आहेत. अपेक्षित नफा मिळाल्यावर ते काही प्रमाणात गुंतवणूक मागे घेतात, मात्र एकूणच परदेशी गुंतवणूकदार भारताला महत्त्व देत आहेत.
क्रेडिट गॅरंटी योजनेचा विस्तार
केंद्रीय अर्थसंकल्पात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना सादर करण्यात आली असून, याच योजनेच्या अनावरणासाठी सीतारामन मुंबईत आल्या होत्या. कार्यक्रमादरम्यान काही उद्योजकांना हमीपत्र देऊन योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
प्रमुख मुद्दे आणि निर्णय
बँक बंद पडल्यास ग्राहकांचे संरक्षण: डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी योजनेअंतर्गत सध्या पाच लाख रुपयांपर्यंत ठेवींचे संरक्षण आहे, मात्र सरकार ही मर्यादा वाढवण्याचा विचार करत आहे.
यंत्रसामग्री खरेदीसाठी सह-तारणाची गरज नाही: कारखान्याच्या यंत्रसामग्री आणि उपकरणांच्या खरेदीसाठी आता १०० कोटी रुपयांपर्यंत सह-तारणाची (कोलॅटरल) गरज राहणार नाही.
महागाई नियंत्रण: रिझर्व्ह बँकेच्या सहकार्याने सरकार महागाई नियंत्रणात आणण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करत आहे आणि लवकरच त्यावर तोडगा निघेल, असे सीतारामन यांनी सांगितले.