घरकुल योजना: १० लाख लाभार्थ्यांसाठी ४५० कोटींचा पहिला हप्ता!
Gharkul Yojana 450 Cr for 10 Lakh Beneficiaries!

राज्यात ग्रामीण गृहनिर्माणासाठी १०० दिवसीय “महाआवास अभियान” १ जानेवारी २०२५ ते १० एप्रिल २०२५ दरम्यान राबवले जात आहे. याअंतर्गत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ मधील २० लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीपत्र देण्यात येणार आहे.
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २२ फेब्रुवारी २०२५ रोजी नव्याने मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे वितरित करण्यात येणार आहेत. पुण्यातील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे दुपारी ४:४५ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ग्रामपंचायत, तालुका व जिल्हास्तरावर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केले जाणार आहे.
याअंतर्गत राज्यातील १० लाख घरकुल लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचा निधी मिळणार असून, सोलापूर जिल्ह्यात २०५० उद्दिष्ट लाभार्थ्यांपैकी १९७६ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी १०४९ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे.
या अभियानाद्वारे १३ लाख नवीन घरकुल मंजुरी, ३ लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता (एकूण ४५० कोटी रुपये) आणि ५ हजार लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. उत्तर सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली.