Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना – शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची संधी!!

Krishi Swayam Sahayata Yojana – A Golden Opportunity for Farmers!!


Telegram Group Join Now

शेती हा अनिश्चिततेने भरलेला व्यवसाय मानला जातो, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन विविध योजना राबवत असते. त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. ही योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राबवली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन सुविधा मिळावी आणि त्यांचे उत्पन्न वाढावे, हा प्रमुख उद्देश आहे. या योजनेत नवीन विहिरीसाठी 4 लाख रुपये व जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी 1 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते.

Krishi Swayam Sahayata Yojana – A Golden Opportunity for Farmers!!

शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली जाते. यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा जास्तीत जास्त 2 लाख रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. राज्यातील मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ 0.40 ते 6.00 हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना मिळतो. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास आणि जीवनमान सुधारण्यास मोठी मदत झाली आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक
शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. विहीर दुरुस्ती किंवा नवीन विहिरीसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकाधिक संख्येने या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांनी केले आहे.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.