Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


खुशखबर-‘लाडकी बहीण’ची मे हफ्त्याला मिळाली हिरवी झेंडी, या तारखेला मिळणार हफ्ता!

Ladki Bahin May June Payment 2025


Telegram Group Join Now

Ladki Bahin May June Payment 2025 Date – ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेंतर्गत मे महिन्यातील रक्कम लवकरच लाभार्थी वहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी एकूण ४१९.३० कोटींचा निधी वितरित करण्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने गुरुवारी मान्यता दिली आहे. हा निधी ‘लाडकी बहीण’ योजनेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र महिला लाभार्थ्यांना देण्यासाठी वापरला जाईल,

Ladki Bahin Yojana Income Tax Verification

असे विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे. या योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने गेल्या महिन्यात एकूण ३ हजार ९६० कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर केला आहे. त्यातील ४१० कोटी रुपये लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याचे पैसे देण्यासाठी वापरले जाणार आहेत. वित्त विभागाने घालून दिलेल्या कार्यप्रणालीनुसार हा निधी महिला व बालविकास विभागाला अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यात आल्याचे यासंदर्भातील शासन निर्णयात नमूद केले आहे.



अन्य महत्वाचे अपडेट्स बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.