आनंदाची बातमी! मुंबईत घराचे स्वप्न होणार पूर्ण! म्हाडा २०२६ च्या २६४० सदनिकांसाठी सोडत जाहीर, करा अर्ज | MHADA lottery 2026 Mumbai
MHADA lottery 2026 Mumbai Registration
Table of Contents
Mumbai MHADA lottery 2026 Application
MHADA lottery 2026 Mumbai: Big News For Home Buyer In Mumbai !! The Mumbai MHADA Lottery 2026 has officially launched, offering a golden opportunity for citizens to own one of 2,640 available apartments across various housing schemes in the city. The lottery includes 1,672 units under active construction, 559 units from redevelopment projects (DCR 33/5 and 33/7), and 409 scattered units from previous draws. Interested applicants can begin the online registration and deposit process starting March 30, 2026, at 3:00 PM, with a final application deadline of April 29, 2024. The non-refundable application fee is set at ₹590 (including 18% GST), and the highly anticipated lucky draw results will be announced on May 15, 2026, at 11:00 AM. Complete details and digital application forms are available on the official portals at housing.mhada.gov.in and mhada.gov.in.
मित्रांनो, आजकलच्या धावपढीत कुठेतरी आपलं गणित चुकतं आणि आपलं हक्कच घर घेण्याचं स्वप्नं हे अपूर्ण राहत पण आता तास होणार नाही कारण मुंबईत स्वतःच्या हक्काचे घर असावे असे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) तर्फे २०२६ च्या नवीन सदनिका विक्रीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सोडतीअंतर्गत मुंबईतील विविध भागांत तब्बल २६४० सदनिकांची विक्री केली जाणार आहे. मुंबई म्हाडा लॉटरी बद्दल या लेखात आपण या लॉटरीचे वेळापत्रक, अर्जाचे शुल्क आणि कोणत्या योजनेत किती घरे आहेत, याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
Read This: छत्रपती संभाजीनगर मंडळ गृहनिर्माण सोडत फेब्रुवारी २०२६ चे निकाल जाहीर
मुंबई म्हाडा लॉटरी २०२६ चा मुख्य तपशील
म्हाडाने गृहनिर्माण व क्षेत्रविकास नियम १९८१ मधील तरतुदीनुसार ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये प्रामुख्याने बांधकाम सुरू असलेल्या सदनिका आणि मागील सोडतीतील शिल्लक राहिलेल्या घरांचा समावेश आहे.

सोडतीचे वेळापत्रक (महत्त्वाच्या तारखा)
अर्ज प्रक्रियेत कोणतीही चूक होऊ नये म्हणून खालील तारखा लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे:
- ऑनलाईन अर्ज आणि अनामत रक्कम भरणा सुरुवात: ३० मार्च २०२६, दुपारी ३.०० वाजल्यापासून.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २९ एप्रिल २०२६, रात्री ११.५९ पर्यंत.
- अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख (Online): ३० एप्रिल २०२६, रात्री ११.५९ पर्यंत.
- प्रारूप यादी (Draft List) प्रसिद्ध होणे: ०५ मे २०२६, दुपारी ३.०० वाजता.
- दावे व हरकती दाखल करणे: ०८ मे २०२६ पर्यंत.
- अंतिम पात्र यादी प्रसिद्ध होणे: १२ मे २०२६, दुपारी ३.०० वाजता.
- सोडतीचा निकाल (Lucky Draw): १५ मे २०२६, सकाळी ११.०० वाजता.
(टीप: सोडतीचे ठिकाण म्हाडातर्फे नंतर जाहीर करण्यात येईल.)
अर्ज शुल्क किती आहे? Mumbai Mhada Lottery Application Fees
या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराला ५९० रुपये (५०० रुपये अर्ज शुल्क + १८% जीएसटी ९० रुपये) भरावे लागतील. हे शुल्क ‘विना परतावा’ (Non-Refundable) आहे, म्हणजेच तुम्ही सोडतीत जिंकलात किंवा नाही, तरी हे पैसे परत मिळणार नाहीत.
सदनिकांचे वर्गीकरण आणि उपलब्ध संख्या
यावेळेस म्हाडाने २६४० घरांची विभागणी चार मुख्य गटांत केली आहे:
१. बांधकाम सुरू असलेल्या सदनिका: १६७२
२. विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) अंतर्गत: ३७१
३. विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत: १८८
४. मागील सोडतीमधील विखुरलेल्या सदनिका: ४०९
एकूण सदनिकांची संख्या २६४० इतकी आहे. मुंबईसारख्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध झाल्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही मोठी संधी आहे.
मुंबई म्हाडा लॉटरी २०२६ अर्ज कसा करावा? How To Fill Mumbai Mhada Lottery Form 2026
तुम्ही म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन घरबसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता:
तसेच, ‘MHADA Housing Lottery System’ हे मोबाईल ॲप डाऊनलोड करूनही तुम्ही अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता.
मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडा लॉटरी हा सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह मार्ग मानला जातो. जर तुम्ही या सोडतीसाठी पात्र असाल, तर आजच कागदपत्रांची पूर्तता करा आणि वेळेत अर्ज भरा. अधिक माहितीसाठी ३० मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजल्यानंतर म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणारी माहितीपुस्तिका नक्की वाचा.
Mumbai MHADA Lottery 2026 अर्ज प्रक्रिया – आवश्यक कागदपत्रे व संपूर्ण माहिती
अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (How to Fill Mumbai MHADA Application 2026 )
MHADA लॉटरीसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे व माहिती आवश्यक असते:
📱 मोबाईल क्रमांक (आधारशी लिंक असलेला)
📧 ई-मेल आयडी
आवश्यक कागदपत्रे:
🆔 आधार कार्ड
💳 पॅन कार्ड
🏡 डोमिसाइल सर्टिफिकेट (Domicile Certificate)
अर्जदाराने मागील 20 वर्षांपैकी किमान 15 वर्ष महाराष्ट्रात वास्तव केले असल्याचा पुरावा आवश्यक
💰 उत्पन्नाचा पुरावा (01 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 कालावधीसाठी)
आयकर रिटर्न (ITR) किंवा
तहसिलदारांकडून दिलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला
MHADA घरे कुठे उपलब्ध आहेत? (Where MHADA Homes Are Located in Mumbai)
मुंबईतील विविध भागांमध्ये सदनिका उपलब्ध आहेत:
कन्नमवार नगर – विक्रोळी
पत्राचाळ, सिद्धार्थ नगर – गोरेगाव
पहाडी – गोरेगाव
जुने मागाठाणे, गोराई – बोरीवली
सुभाष नगर – चेंबूर
गांधीनगर – वांद्रे
पंतनगर – घाटकोपर
अँटॉप हिल – वडाळा
लोकमान्य नगर – दादर
गिरगाव, वडाळा, माझगाव, कोपरी-पवई, तुंगा पवई
उत्पन्नाचा दाखला – महत्त्वाच्या सूचना
कौटुंबिक उत्पन्नात अर्जदार व त्यांचे पती/पत्नी यांचे मिळून उत्पन्न धरले जाते
खालील कागदपत्रेच वैध मानली जातील:
आयकर विवरणपत्र (FY 2024-25 / AY 2025-26)
तहसिलदारांचा उत्पन्नाचा दाखला
खालील कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार नाहीत:
प्रतिज्ञापत्र
वेतन प्रमाणपत्र
इतर कोणतेही अनौपचारिक पुरावे
जर पती-पत्नी दोघेही कमावते असतील, तर:
“Working Status: Both” निवडणे आवश्यक
दोघांचे उत्पन्न दाखवणे बंधनकारक
मुंबई म्हाडा लॉटरी २०२६ – वेळापत्रक
| टप्पा | दिनांक व वेळ |
|---|---|
| ऑनलाईन अर्ज सुरुवात | ३०/०३/२०२६ (दुपारी ३.०० वा.) |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | २९/०४/२०२६ (रात्री ११.५९ वा.) |
| अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख | ३०/०४/२०२६ (रात्री ११.५९ वा.) |
| प्रारूप यादी प्रसिद्धी | ०५/०५/२०२६ (दुपारी ३.०० वा.) |
| अंतिम यादी प्रसिद्धी | १२/०५/२०२६ (दुपारी ३.०० वा.) |
| सोडतीचा निकाल (Lottery Draw) | १५/०५/२०२६ (सकाळी ११.०० वा.) |
मुंबईमध्ये म्हाडाची लॉटरी आहे का? सदनिकांची संख्या (योजनानिहाय)
| योजनेचा प्रकार | एकूण सदनिका |
|---|---|
| नवीन बांधकाम सुरू असलेल्या सदनिका | १६७२ |
| विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) | ३७१ |
| विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) | १८८ |
| मागील सोडतीतील सदनिका | ४०९ |
| एकूण सदनिका संख्या | २६४० |
Mumbai Mhada Home Registration 2026
| उत्पन्न गट | वार्षिक उत्पन्न मर्यादा |
|---|---|
| अत्यल्प उत्पन्न गट (EWS) | ₹6 लाखांपर्यंत |
| अल्प उत्पन्न गट (LIG) | ₹9 लाखांपर्यंत |
| मध्यम उत्पन्न गट (MIG) | ₹12 लाखांपर्यंत |
| उच्च उत्पन्न गट (HIG) | ₹12 लाखांपेक्षा अधिक |
Mumbai Mhada Helpline Number
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने या योजनेतील सदनिकांच्या वितरणासाठी किंवा याबाबतच्या कोणत्याही कामासाठी कोणालाही प्रतिनिधी / सल्ला देणारा वा प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर पैशांचा व्यवहार केल्यास त्याला मुंबई मंडळ / म्हाडा जबाबदार राहणार नाही. तसेच अर्जदारास कोणी दलाल / व्यक्ती परस्पर अर्ज विक्री किंवा म्हाडाच्या नावे पैसे उकळणे किंवा फसवणूक करणे इ. बाबी करताना आढळल्यास म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी/प्राधिकरण, तसेच उपमुख्य अधिकारी (पणन) / मुंबई मंडळ यांचे कार्यालयास कळवावे, त्यांचे दुरध्वनी पुढीलप्रमाणे आहेत.
मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी/प्रा यांचे दूरध्वनी क्रमांक : ०२२-६६४०५४४८
मिळकत व्यवस्थापक/पणन / मुंबई मंडळः ०२२-६६४०५१२३
Mumbai Mhada Helpline Number अधिक माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक : ०२२-६९४६८१००


