भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी खुले: ऑनलाईन नोंदणी अनिवार्य | Bhimashankar Temple Online Registration Process
Bhimashankar Temple Online Registration Process
Shri Kshetra Bhimashankar Temple Opening 2026
Bhimashankar Temple Online Registration Process: The famous Shree Kshetra Bhimashankar Temple, which had been closed for extensive renovation and development work, is officially scheduled to reopen for devotees on June 15, 2026. To manage crowds and ensure a smooth experience, the temple trust has introduced new guidelines, including daily visitor caps and mandatory pre-registration. The temple was initially closed on January 9, 2026, to fast-track structural upgrades in anticipation of the massive footfall expected for the 2027 Sinhasth Kumbh Mela in Nashik. The closure was later extended to May 31, 2026. Know how to register for Bhimashankar Temple Darshan 2026, Get details about Bhimashankar Temple Online Registration Process at below
गेल्या काही महिन्यांपासून विकासकामांसाठी बंद असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर अखेर १५ जून २०२६ पासून भाविकांच्या दर्शनासाठी पुन्हा खुले होणार आहे. मंदिर प्रशासनाने गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी दररोज भाविकांच्या संख्येवर मर्यादा घालत ऑनलाईन नोंदणी बंधनकारक केली आहे.
महत्त्वाचे नियम आणि नियमावली
Note: Registration for Bhimashankar Mandir is yet to be opened as soon as the link is activated we will give you step by step process How To Register for Bhimashankar Darshan 2026
- मंदिर उघडण्याची तारीख: १५ जून २०२६.
- दररोजची भाविक मर्यादा: दररोज केवळ १,००० भाविकांनाच प्रवेश दिला जाईल.
- ऑनलाईन नोंदणी: दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग ५ जून २०२६ पासून सुरू होईल. नोंदणीकृत भाविकांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध केली जाईल.
- दर्शनाची वेळ: १५ ते ३० जून या कालावधीत दररोज सकाळी ७:०० ते ११:०० वाजेपर्यंतच दर्शन घेता येईल.
- ओळखपत्र अनिवार्य: ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांना दर्शनाच्या वेळी आपले वैध ओळखपत्र (ID Proof) सोबत आणणे बंधनकारक आहे.
मंदिर बंद का होते? Why Was the Bhimashankar Temple Closed?
२०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकरमध्ये होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेण्यात आली होती. यासाठी ९ जानेवारी २०२६ पासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते.
मुख्य मंदिरासमोरील भव्य सभामंडप आणि पायरीमार्गाच्या उभारणीसाठी सुमारे एक वर्षाचा काळ लागणे अपेक्षित होते. मात्र, भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट, स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या अहोरात्र प्रयत्नांमुळे हे काम अवघ्या ५ महिन्यांत पूर्णत्वास आले आहे. ३१ मे पर्यंत मुख्य बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, दर्शनबारी आणि परिसर स्वच्छतेची कामे १५ जूनपर्यंत पूर्ण केली जातील
Bhimashankar Temple Reopening Schedule & Guidelines (June 2026)
| Event / Guideline | Details (English) | तपशील (मराठी) |
|---|---|---|
| Online Registration Starts | June 5, 2026 | ५ जून २०२६ पासून सुरू |
| Official Reopening Date | June 15, 2026 | १५ जून २०२६ |
| Daily Visitor Limit | Maximum 1,000 devotees per day | दररोज कमाल १,००० भाविक |
| Darshan Timings (June 15 – June 30) | 7:00 AM to 11:00 AM daily | दररोज सकाळी ७:०० ते ११:०० वाजेपर्यंत |
| Mandatory Requirement | Valid photo ID matching online registration | ऑनलाईन नोंदणीशी जुळणारे वैध ओळखपत्र |


