Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel



परदेशी नागरिकांसाठी इमिग्रेशनच्या नियमात मोठा बदल; १८० दिवसांत नोंदणी करणे आवश्यक, गृह मंत्रालयाचे नवे आदेश | New immigration guidelines for foreigners in India

New immigration guidelines for foreigners in India


Telegram Group Join Now

New Immigration Guidelines for Foreigners In India

New immigration guidelines for foreigners in India: India Immigration Rules Change 2026: The Ministry of Home Affairs has updated the foreigners registration rules in India, making pre-registration mandatory for those staying beyond 180 days. Under the new FRRO registration 180 days rule, foreign nationals must complete their registration before their current visa expires, as the previous 14-day grace period has been removed. This crucial update also introduces new immigration guidelines for foreigners in India, offering specific exemptions for the registration of children born to foreign parents when one parent is an Indian citizen. Keeping track of these updated MHA rules for children of foreign parents in India is essential for expats to ensure hassle-free visa extensions and avoid penalties. Know more about New immigration guidelines for foreigners in India at below

केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘इमिग्रेशन अँड फॉरेनर्स रूल्स’ अंतर्गत नियमांमध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे बदल केले आहेत. भारतात १८० दिवसांपेक्षा जास्त काळ वास्तव्याची इच्छा असलेल्या परदेशी नागरिकांसाठी आता नोंदणी (Registration) करण्याची कालमर्यादा बदलण्यात आली असून, नवीन नियमांनुसार पूर्व नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय, परदेशी पालकांच्या मुलांशी संबंधित काही विशिष्ट प्रकरणांमध्ये नियमांतून अंशतः सूटही देण्यात आली आहे.

पूर्व नोंदणी आता बंधनकारक – India immigration rules change 2026

नव्या नियमांनुसार, जे परदेशी नागरिक १८० दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या वैध व्हिसावर भारतात आले आहेत, परंतु त्यांना निर्धारित काळापेक्षा अधिक काळ भारतात राहण्याची गरज भासल्यास, त्यांनी आपला व्हिसा संपण्यापूर्वीच नोंदणी करणे अनिवार्य आहे.

यापूर्वीच्या नियमांनुसार, व्हिसा संपल्यानंतरही पुढील १४ दिवसांपर्यंत नोंदणी करण्याची मुभा दिली जात होती. मात्र, गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन अधिसूचनेनुसार हा नियम आता बदलला आहे. आता उशिराने केलेली नोंदणी केवळ अत्यंत आपत्कालीन किंवा अपवादात्मक परिस्थितीतच मंजूर केली जाईल.

नवीन नियमांमधील महत्त्वाचे मुद्दे आणि सूट:

परदेशी पालकांच्या मुलांना दिलासा: नव्या नियमांनुसार, ज्या मुलांचे एक किंवा दोन्ही पालक परदेशी नागरिक आहेत, त्यांना काही प्रमाणात दिलासा देण्यात आला आहे.

नोंदणीची जुनी पद्धत: पूर्वीच्या नियमांनुसार अशा प्रकरणांमध्ये, मुलाच्या जन्मानंतर नवीन व्हिसा आणि देश सोडण्याची परवानगी (Exit Permit) यांसारख्या सेवा मिळवण्यासाठी पालकांना ३० दिवसांच्या आत ऑनलाईन पोर्टल किंवा मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे नोंदणी अधिकाऱ्याला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने माहिती देणे आवश्यक होते.

भारतीय नागरिकत्व असल्यास नवा नियम लागू नाही: नव्या अधिसूचनेनुसार, ज्या प्रकरणांमध्ये मुलाचा एक पालक भारतीय नागरिक आहे आणि त्यांना आपल्या मुलाचे भारतीय नागरिकत्व कायम ठेवायचे आहे, अशा प्रकरणांमध्ये हा नवीन उप-नियम लागू होणार नाही.

गृह मंत्रालयाने सुरक्षेच्या दृष्टीने आणि इमिग्रेशन प्रक्रिया अधिक पारदर्शक व कडक करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे भारतात येणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांना आता आपल्या वास्तव्याची मुदत संपण्यापूर्वीच कायदेशीर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.



अन्य महत्वाचे अपडेट्स बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.