शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना: ५३३ पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर| Punyashlok Ahilyadevi Holkar Farmers’ Loan Waiver Scheme
Maharashtra Farmers' Loan Waiver Scheme
Table of Contents
Ahilya Devi Holkar Karjmukti Yojana Yadi
Maharashtra Farmers’ Loan Waiver Scheme: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना: ५३३ पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर | राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला वेगाने सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या ५३३ शेतकऱ्यांची पहिली यादी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी अधिकृतपणे जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे आणि दिवंगत उपमुख्यमंत्र्यांच्या जयंतीचे औचित्य साधून या पहिल्या टप्प्याची सुरुवात करण्यात आली.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि तरतूद
- एकूण आर्थिक तरतूद: राज्य शासनाने या कर्जमाफी योजनेसाठी ₹३६,५८५ कोटींचा भरीव निधी मंजूर केला आहे.
- एकूण लाभार्थी: राज्यातील ५६ लाख पात्र शेतकऱ्यांना ४०,९८० कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे.
- महात्मा फुले योजनेतील लाभार्थी: महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या १२ लाख शेतकऱ्यांना ₹२ लाखांपर्यंतचा अतिरिक्त लाभ दिला जाईल.
- प्रोत्साहनपर लाभ: नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या २३.६३ लाख शेतकऱ्यांना ₹५०,००० पर्यंतचे प्रोत्साहन अनुदान दिले जाईल.
- करदाते आणि २ लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी नियम
- प्राप्तिकर (Income Tax) भरणारे शेतकरी: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील ७,४८,४९६ करदात्या शेतकऱ्यांची यादी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे (CBDT) पडताळणीसाठी पाठवण्यात आली आहे.
शेतीबाह्य उत्पन्नातून कर भरणाऱ्या श्रीमंत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. केंद्राकडून डेटा प्राप्त होताच उर्वरित पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध केली जाईल.
₹२ लाखांवरील कर्जदार:
ज्या शेतकऱ्यांवर २ लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे (असे सुमारे २.९० लाख शेतकरी), त्यांना २ लाखांवरील उर्वरित रक्कम भरण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ही रक्कम भरल्यानंतरच त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल.
कर्जमाफीची प्रक्रिया आणि नवीन पीककर्ज वितरण
- आधार प्रमाणीकरण आणि Agristack: पात्र शेतकऱ्यांना ‘आपले सरकार’ केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) करावे लागेल. ज्यांची ‘AgriStack’ वर नोंदणी नसेल, त्यांची नोंदणी करून थेट DBT (Direct Benefit Transfer) द्वारे रक्कम कर्ज खात्यावर जमा केली जाईल.
- तात्काळ नवीन पीककर्ज: कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांना तात्काळ नवीन पीककर्ज उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- ₹९५,००० कोटींचा आराखडा: सन २०२६-२७ साठी ६४ लाख शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, खरीप हंगामासाठी ₹५२,८८२ कोटी तर रब्बी हंगामासाठी ₹२२,६२७ कोटींचे वाटप नियोजित आहे.
पहिल्या यादीतील जिल्हानिहाय पात्र शेतकरी (एकूण: ५३३)
| जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक | पात्र शेतकरी संख्या |
|---|---|
| अमरावती | ५८ |
| लातूर | १३३ |
| नागपूर | १६ |
| पुणे | ८५ |
| सातारा | ३८ |
| सोलापूर | २१ |
| ठाणे | १८२ |
| एकूण | ५३३ |
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६’ अंतर्गत मोठी प्रगती झाली आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या याद्याही टप्प्याटप्प्याने लवकरच प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. लाभ मिळवण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक (AgriStack) वर नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून तिची पडताळणी पूर्ण झाली आहे. आधार प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठविण्यात येणार आहेत. याशिवाय ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच संबंधित बँकांच्या शाखांमध्येही लाभार्थ्यांच्या याद्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
प्रत्येक पात्र शेतकऱ्याला विशिष्ट ओळख क्रमांक (Unique ID) देण्यात येणार असून, आधार क्रमांक किंवा या ओळख क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक राहील. ही सुविधा राज्यभरातील सुमारे ३२ हजार ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ मार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रक्रिया पूर्ण करणे अधिक सोपे होणार आहे.
ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे कर्जमुक्तीची रक्कम जमा केली जाईल. ही योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून शेतीसाठी नवी ऊर्जा आणि बळ देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmers’ Loan Waiver Scheme
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmers’ Loan Waiver Scheme: महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने सुरू असून, आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्याचे नियोजन सहकार विभागाने केले आहे.
राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून, त्यासाठी सरकारकडून जवळपास 36 हजार 500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मोठा दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांनी तातडीने आधार माहिती बँकेत द्यावी – Farm Loan Waiver
सहकार विभागाने सर्व पात्र शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपल्या कर्ज खात्याशी आधार क्रमांक जोडलेला नाही, त्यांनी तातडीने संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन आधार माहिती सादर करावी. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्याशिवाय कर्जमाफीची रक्कम जमा होऊ शकणार नाही. त्यामुळे कोणताही विलंब टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.
आधार पडताळणी झाल्यानंतर थेट खात्यात जमा होणार रक्कम
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी शासनाने डिजिटल प्रणालीचा वापर केला आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याची आधार पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून कर्जमाफीची रक्कम थेट संबंधित कर्ज खात्यात जमा केली जाणार आहे. यामुळे कोणत्याही मध्यस्थाशिवाय लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असून संपूर्ण प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि जलद होणार आहे.
56 लाख शेतकऱ्यांना मिळणार मोठा लाभ
राज्य सरकारच्या अंदाजानुसार या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यासाठी सुमारे 36,500 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. ही योजना राज्यातील सर्वात मोठ्या कर्जमुक्ती योजनांपैकी एक मानली जात असून, शेती क्षेत्राला आर्थिक बळ देण्यासाठी ती महत्त्वाची ठरणार आहे.
बँकांना देण्यात आल्या महत्त्वाच्या सूचना
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सुरळीत आणि पारदर्शक व्हावी यासाठी सहकार आयुक्त व निबंधक तसेच जिल्हा बँकर्स समितीमार्फत सर्व व्यापारी आणि सहकारी बँकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. बँकांनी पात्र शेतकऱ्यांचे आधार क्रमांक गोळा करून त्यांची माहिती शासनाच्या प्रणालीमध्ये अद्ययावत करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय सर्व बँकांनी पात्र कर्ज खात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे कामही सुरू केले आहे.
प्रत्येक पात्र कर्ज खात्याला मिळणार स्वतंत्र क्रमांक
- योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी शासनाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
- सर्व पात्र शेतकऱ्यांची कर्ज माहिती अपलोड झाल्यानंतर प्रत्येक कर्ज खात्याला स्वतंत्र विशिष्ट कर्ज खाते क्रमांक (Unique Loan Account Number) दिला जाणार आहे.
- यामुळे प्रत्येक लाभार्थ्याची माहिती स्वतंत्रपणे तपासता येणार असून गैरव्यवहाराला आळा बसणार आहे.
काय केल्या सुधारणा – Ahilya Devi Holkar Farmer Loan Changes Rule
मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या घोषणेनुसार, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी असलेली ५० हजार रुपये लाभाची मर्यादा ही अट रद्द करण्यात आली. आता या शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा संपूर्ण लाभ मिळणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ मध्ये नवीन कर्ज घेऊन ते वेळेत परतफेड करण्याची अटही रद्द करण्यात आली आहे.
पुर्वीच्या सुचनेनुसार दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकीत कर्ज असलेल्या अनेक शेतकऱ्यांना दोन लाखांपेक्षा जादा रक्कम भरण्याची अटही रद्द करण्यात आली आहे.दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असली, तरी त्यातील दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम शासनाकडून माफ करण्यात येणार आहे.
पात्र शेतकऱ्यांची यादी कुठे पाहता येणार? Eligible List Of Farmer For Loan Waiver
शेतकऱ्यांना आपल्या नावाची खात्री करता यावी यासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी सार्वजनिक करण्यात येणार आहे.
ही यादी खालील ठिकाणी उपलब्ध असेल.
- संबंधित बँक शाखा
- ग्रामपंचायत कार्यालय
- तलाठी कार्यालय
- शासनाच्या अधिकृत पोर्टलवर
यामुळे शेतकरी स्वतःचे नाव तपासू शकतील आणि काही त्रुटी असल्यास वेळेत दुरुस्ती करू शकतील.
2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी
पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाची कर्जमाफी दिली जाणार आहे. यामध्ये केवळ थकीत कर्जच नव्हे तर पुनर्गठित (Restructured) आणि फेरपुनर्गठित (Restructured Again) कर्जांचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे आर्थिक अडचणींमुळे कर्जाची पुनर्रचना केलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांसाठीही विशेष तरतूद
- ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांच्यासाठीही शासनाने विशेष तरतूद केली आहे.
- अशा शेतकऱ्यांनी दोन लाख रुपयांवरील अतिरिक्त रक्कम स्वतः बँकेत जमा केल्यानंतर त्यांना 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ दिला जाईल.
- यामुळे मोठे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा फायदा मिळणार आहे.
- नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन
- राज्य सरकारने केवळ थकीत कर्जदारांचाच विचार केलेला नाही, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांनाही विशेष दिलासा दिला आहे.
- जे शेतकरी वेळेवर पीक कर्जाची परतफेड करतात, त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे.
- या निर्णयामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे.
पूर्वी कर्जमाफी घेतलेल्यांनाही मिळणार लाभ
तसेच आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, यापूर्वी शासनाच्या कर्जमाफी योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही नियमित कर्जफेड केल्यास 50 हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र मानले जाणार आहे. यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. कर्जमाफी झाल्यानंतर नवीन पीक कर्जही मिळणार सहकार विभागाने सर्व बँकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल त्यांना चालू हंगामासाठी नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. म्हणजेच कर्जमाफी झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना पुन्हा शेतीसाठी आवश्यक भांडवल सहज उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतीच्या कामांमध्ये आर्थिक अडचण निर्माण होणार नाही.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा मुख्य उद्देश काय?
- ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ ही केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नाही.
- या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि शेती व्यवसायाला नवसंजीवनी देणे हा आहे.
- कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना नव्याने उभे राहण्याची संधी देणे आणि त्यांना पुन्हा शेतीसाठी सक्षम करणे हे या योजनेमागील प्रमुख उद्दिष्ट आहे.
सहकार विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
- सहकार विभागाने सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणताही विलंब न करता आपल्या बँक शाखेत जाऊन आधार क्रमांक कर्ज खात्याशी जोडण्याचे आवाहन केले आहे.
- आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच कर्जमाफीची रक्कम जमा होणार असल्यामुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.
- राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून, कर्जमुक्त झाल्यानंतर ते नव्या उत्साहाने शेती व्यवसाय सुरू ठेवू शकतील. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा.


