Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel



७४ हजार महिलांचा लाभ बंद, इतक्या लाडक्या बहिणी ठरल्या पात्र, पाहा आकडेवारी – Ladki Bahin New List Check

Ladki Bahin New List Check


Telegram Group Join Now

Ladki Bahin New List Check – लाडकी बहीण योजने बद्दल महत्वाचा अपडेट समोर आला आहे. लाडकी बहीण योजनेत संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल ७४ हजार महिला अपात्र ठरल्या आहेत. ई-केवायसी आणि विविध शासकीय विभागांच्या नोंदींची सखोल पडताळणी केल्यानंतर ही संख्या समोर आली आहे. परिणामी, जिल्ह्यातील लाभार्थी महिलांची संख्या सहा लाखांवरून सुमारे ५ लाख २५ हजारांवर आली आहे. राज्यभरातही मोठ्या प्रमाणावर छाननी करण्यात आली असून, सुमारे ८१ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. ई-केवायसी नंतर राज्यात १ कोटी ६६ लाख महिला पात्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाने पात्रता निकषांची अंमलबजावणी अधिक कठोर केल्याने अपात्र लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात समोर आली आहे. लाभार्थ्यांची ओळख आणि पात्रता निश्चित करण्यासाठी प्रशासनाने जवळपास आठ ते दहा महिने ई-केवायसी मोहीम राबविली. या कालावधीत आयकर विभाग, आरटीओ आणि इतर शासकीय विभागांच्या नोंदींची तुलना करून माहितीची तपासणी करण्यात आली. त्यामुळे नियमबाह्य लाभ घेणाऱ्या अनेक लाभार्थ्यांची नावे समोर आली. चला तर बघूया आता या बहिणींनी काय करावे आणि अन्य बहिणींनी काय काळजी घ्यावी तर. म्हणजे आपला लाभ सुरळीत पणे सुरु राहील. 

Ladki Bahin New List Check
अपात्रतेमागील प्रमुख कारणे:

  • कुटुंबाचे उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त
  • कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेत असणे
  • आयकरदाते असणे
  • चारचाकी वाहनाची नोंद असणे
  • इतर शासकीय योजनांतील माहितीशी विसंगती
  • ई-केवायसीदरम्यान आढळलेल्या त्रुटी
  • आठ-दहा महिने सुरू होती पडताळणी

पडताळणी पूर्ण होण्यापूर्वी अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळाला होता. काही अपात्र लाभार्थ्यांनी १५ ते २० महिने अनुदान घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांकडून मिळालेल्या अनुदानाची वसुली करण्याबाबत शासनस्तरावर हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नियमबाह्य पद्धतीने लाभ घेतलेल्या पुरुष लाभार्थ्यांचाही शोध घेतला जात असून, त्यांच्याकडूनही रकमेची वसुली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 



अन्य महत्वाचे अपडेट्स बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.