आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची संधी; घरबसल्या मिळवा फ्री सुविधा, वापरा सोप्या स्टेप्स | Aadhar Card Update Last date

Aadhar Card Update Last date


Telegram Group Join Now

Aadhar Card Update Last date

Aadhar Card Update Last date: आधार कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. तुमच्या आधार कार्डमध्ये नाव, जन्म दिनांक, पत्ता यांसारख्या माहितीमध्ये कोणतीही चूक असल्यास ती दुरुस्त करण्याची संधी सध्या मोफत उपलब्ध आहे. पण लक्षात घ्या, ही संधी फक्त काही दिवसांसाठीच आहे

Aadhaar Update Deadline 

म्हातारपणी उमटेना बोटांचे ठसे, आधार अपडेट करायचे कसे? सकाळ वृत्तसेवा 13 July 2024 आधार कार्ड आता अनेक सरकारी आणि खासगी कामांसाठी आवश्यक बनले आहे. शाळेत प्रवेश घेणे, नोकरी मिळवणे, बँक खाते उघडणे किंवा सरकारी योजनांचा लाभ घेणे या सर्व ठिकाणी आधार कार्ड लागते. जर तुमच्या आधार कार्डमध्ये एखादी चुकीची माहिती असेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते. आधार कार्ड जारी झाल्यावर 10 वर्षांपेक्षा जास्त वेळ झाला असेल तर ते देखील अपडेट करणे आवश्यक आहे. UIDAI (यूआयडीएआय) ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2024 आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ही मोफत अपडेटची सुविधा ऑनलाईन पद्धतीसाठीच आहे. आधार कार्ड केंद्रावर जाऊन अपडेट करायाचे असल्यास 50 रुपये शुल्क द्यावे लागेल.

आधार कार्ड ऑनलाईन अपडेट कसे कराल? How To Update Aadhar Card Online

  • UIDAI ची अधिकृत वेबसाइट uidai.gov.in ला भेट द्या.
  • ‘My Aadhaar’ या सेक्शन जा. • ‘Update Your Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करा आणि खाली येणाऱ्या मेनूमधून ‘Update Demographics Data and Check Status’ निवडा.
  • तुमचा आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड टाका. नंतर ‘Send OTP’ वर क्लिक करा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक वेळचा पासवर्ड (OTP) येईल.
  • प्राप्त झालेला OTP वापरून लॉग इन करा आणि ज्या माहितीमध्ये बदल करायचा आहे त्या माहितीच्या पेजवर जा.
  • आवश्यक माहितीमध्ये बदल केल्यानंतर, ते जमा करण्यापूर्वी संबंधित कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
  • सर्व माहिती जमा केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर एक अपडेट रिक्वेस्ट आयडी येईल. या आयडीच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या अर्जामचा स्टेटस नंतर कधीही तपासू शकता. आधार कार्ड अपडेट करण्याची ही शेवटची मोफत संधी आहे. म्हणून वेळ न घालवता लगेच तुमचे आधार कार्ड अपडेट करा.


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.