Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


खुशखबर! १७० ‘आयुष’ पॅकेज लवकरच ‘आयुष्मान भारत’ मध्ये मिळणार!

ayushman bharat new scheme


Telegram Group Join Now

मित्रांनो, आयुष्मान योजनेत अजून एक मत्वाचा टप्पा समाविष्ट झाला आहे. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत आरोग्य विमा योजनेत ‘आयुष’ उपचाराची १७० पॅकेज लवकरच समाविष्ट करण्यात येतील, अशी माहिती आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. जाधव यांनी सांगितले की, मधुमेह, हायपर टेन्शन यासारख्या संसर्गजन्य नसलेल्या आजारांवरील १७० पॅकेजचा आयुष्मान भारत योजनेत समावेश करण्यात येणार आहे. हि सर्व लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

ayushman bharat new scheme

यासंदर्भात राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणासोबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे. याबाबत आयुष मंत्रालयासोबत प्राधिकरणाच्या काही बैठका झाल्या आहेत. पॅकेजच्या किमती ठरवण्यासाठी एक समिती स्थापन केल्याची माहितीही जाधव यांनी दिली. ज्येष्ठ नागरिकांसाठी १०० दिवसांमध्ये १० हजार आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचे ठरवले होते. आतापर्यंत १४,६९२ आयुष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात मोफत सल्ला तसेच आयुष उपचारप‌द्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आल्याचे प्रतापराव जाधव यांनी सांगितले, २९४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून हरयाणाच्या पंचकुला येथे राष्ट्रीय आयुर्वेद संस्था उभारण्यात आली असून, तेथे २५० खाटांचे रुग्णालय राहणार आहे. आयुर्वेदमध्ये पदव्युत्तर आणि डॉक्टरेट हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.